शिवसेनेची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवा तालुका प्रमुख संजय देशमुख

। अक्कलकोट : प्रतिनिधी
‘गांव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक’ या ब्रीद वाक्याने शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या संकल्पना पुर्ण करावी. छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विचाराने अक्कलकोट तालुक्यातील करजगी व जेऊर जिल्हापरिषद गट भागात शिवसेना पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवावे. शिवसैनिक म्हणुन घरोघरी जाऊन शिवसेनेचे विचार रूजवा असे आवाहन तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी केले.
ते गुरूवार सकाळी अक्कलकोट येथे शिवसेना जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे यांच्या आदेशानुसार तालुका प्रमुख संजय देशमुख व उपप्रमुख आनंद बुक्कानुरे उपप्रमुख प्रा सुर्यकांत कडबगांवकर यांच्या उपस्थितीत नुतन पदाधिकारी निवडण्यात आले. त्यावेळी देशमुख बोलत होते. यावेळी निवडीबद्दल नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जेऊर जि प गट विभाग प्रमुख पंडित मोरे, करजगी पंचायत समिती उप विभाग प्रमुख चौडप्पा गुजा, मंगरूळ (पान) पंचायत समिती उप विभाग प्रमुख कृष्णा रजपुत यांची तालुका प्रमुख संजय देशमुख, तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे, तालुका उपप्रमुख सुर्यकांत कडबगांवकर आदींच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कल्याणी गुब्याड, नितीन मोरे, शिवानंद पटण्णशेट्टी, रफीक मुजावर, धनसिंग रजपुत, इरण्णा भुयारे ,मल्लिकार्जुन बावकर, हणमंत हेगोंडे, शशिकांत बरगले आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.