शिरवळ ते सदलापूर रस्त्यावर खड्डे, वाहनधारकांमध्ये तीव्र संताप

। शिरवळ : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ, सदलापूर, सलगर, भागसगी मार्गे जाणार्या मैंदर्गी रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील भराव वाहून गेल्याने अनेक पुलांची दुरवस्था झाली आहे. 2019 च्या बजेटमध्ये या रस्त्यासाठी 3 कोटी रुपये मंजूर झाले. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. पण प्रत्यक्षात कामला सुरूवात झाली नाही. त्यामुळे वाहनधारकांत संताप व्यक्त होत आहे.
शिरवळ- सदलापूर रस्त्यावर थोडाही पाऊस झालं की संपूर्ण रस्ता चिखलमय होतो. अशात मार्ग काढताना प्रवाशांची दमछाक होते. अपघात ही घडत अहोत. याबाबत वागदरी गटाचे जि.प. सदस्य आनंद तानवडे यांनी ततकलीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकहे पाठपुरावा, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून 3 तोटी रुपये मंजूर झाले. सार्वजनिक बांधकाम विाभग व संबंधित ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत आहेत. रस्त्याचे काम न झाल्याने शाळकरी विद्यार्थी, ऊस वाहतूक, शेतकरी, मजूर व अनेक खेड्यातील लोक प्रवास करतात. मोठे मोठे खडे, दुतर्फा काटेरी झाडांचा विळखा आहे. अनेकांना मणक्याचे आजार बळावले आहेत. ऊस वाहतूक या मार्गाने मोठ्या प्रमाणात होते. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.