शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवू : अशोक भांजे

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीच्या संदर्भात अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक समितीसोबत गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत सर्वच प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसंदर्भाने सकारात्मक चर्चा झाली.काही प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात आले आणि उर्वरित प्रश्न महिन्याभरात मार्गी लावण्याचे गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे यांनी आश्वासन दिल्याची माहिती अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सिद्धाराम बिराजदार यांनी दिली.
प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीच्या संदर्भाने आयोजित बैठकीत तालुक्यातील शिक्षक समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी तालुकास्तरावरील प्रलंबित प्रश्न सोडवणुकीच्या संदर्भात निवेदन संघटनेच्या वतीने देण्यात आले.यात प्रामुख्याने सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे कुटुंब निवृत्तीवेतन,7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्तीवेतन, गटविमा, वेतन आयोगाच्या हफ्ते आदी तातडीने अदा करण्यात यावे,परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन धारकांचा सन 2009 पासूनचा अचूक हिशोब शासनहिस्सा आणि व्याजासह देण्यात यावा, अंशदान कपात दिनांकापासून व्याजाची आकारणी संदर्भात प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करणे, मयत परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन धारकांचे सानुग्रह अनुदान आणि गटविमा प्रस्ताव तात्काळ सादर करणे, 7 व्या वेतन आयोगाच्या वेतननिश्चितीचे विवरणपत्र कार्यालय प्रमुखांच्या स्वाक्षरीने अदा करण्यात यावे,चुकीच्या वेतननिश्चितीची दुरुस्ती, वेतनवाढ फरक, आयकर कपात, वेतन-भनिनी-वैद्यकीय देयके विलंबाबाबत धोरणात्मक निर्णय,निवडश्रेणी माहिती तात्काळ सादर करणे, रजा मान्यता प्रस्ताव, उपस्थिती भत्ता वाटप आदी प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे यांनी मान्य करत तसे आदेशही संबंधितांना दिल्याची माहिती सरचिटणीस होन्नप्पा बुळळा यांनी दिली.
सेवापुस्तक अद्यावत करणेबाबत कॅम्पचे आयोजन आणि सेवापुस्तक वेतन पडताळणी,गोपनीय अहवाल प्रत देण्याची कार्यवाही तात्काळ मार्गी लावण्याचे मान्य करत उर्वरित शिक्षकांना मराठी-हिंदी सूट मान्यतेचे प्रस्ताव सादर करणेबाबत कार्यवाही करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी भांजे यांनी दिल्याची माहिती तालुकाध्यक्ष सिद्धाराम बिराजदार यांनी दिली. यावेळी पुणे विभागीय अध्यक्ष दयानंद कवडे,शिक्षक नेते राजशेखर उंबराणीकर,तालुकाध्यक्ष सिद्धाराम बिराजदार, सरचिटणीस होन्नप्पा बुळळा,कन्नड विभाग जिल्हाध्यक्ष बसवराज गुरव, जिल्हा संघटक विश्वनाथ सुतार, कार्यालयीन चिटणीस शिवानंद बिराजदार, जिल्हा उपाध्यक्ष सायबण्णा गंगदे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सिद्धराम डोळळे, जिल्हा सल्लागार श्रीशैल हडलगी, ईस्माईल मुर्डी,शिक्षक नेते शंकर अजगोंडे, गौतम कांबळे, संचालक विजयकुमार कोळी, शंकरलिंग माशाळे, कार्याध्यक्ष सिद्धाराम तेग्गेळी,उपाध्यक्ष कल्याणी गंगोंडा, केदारनाथ कोळी, पंडित आंदेवाडी, यल्लप्पा ईटेनवरू, विजयकुमार कलशेट्टी, वासुदेव देसाई, संगण्णा फताटे, प्रसिद्धी प्रमुख शरणप्पा फुलारी, अमोल शिंदे, अमोल बोराळे, राजकुमार गोब्बूर, प्रभुलिंग येळसंगी, बसवराज स्वामी, उल्हास अंकलगी, केंद्रसंघटक राजशेखर करपे, बसवराज सक्करगी, मक्तूमसाब इनामदार, भीमण्णा गवळी, गुरप्पा दर्शनाळे, अशोक राठोड, संतोष दांगट, दयानंद चव्हाण आदी.पदाधिकारी उपस्थित होते.