शहरात येणारे जड वाहतूक बंदीसाठी शिवसेनेचे निवेदन

। अक्कलकोट : प्रतिनिधी
सध्या दिवाळीचा सण असून शहरातील जुना अडत बाजार, वीर सावरकर चौक, तूप चौक, मेन रोड कापड बाजार येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ऐन दिवाळी सणात मोठ्या प्रमाणात जड वाहतूक येत असल्याने पादचार्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे आहे. सदरची जड वाहतूक सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत बंद करण्यात यावी.
याबरोबरच राजे फत्तेसिंह चौक ते कारंजा चौक हा रस्ता गेल्या काही वर्षापासून वनवे आहे ते कायम रहावे दररोज रात्री सात वाजताच्या दरम्यान शहरातील स्वच्छता करण्यात येत आहे. ही वेळ बदलून रात्री 9 वाजता ह्या वेळेस करण्यात यावी. तसेच जुना अडत बाजार येथे चार चाकी व जड वाहन रात्र व दिवसा भर बाजारात पार्किंग करत आहे. तरी जुना अडत बाजार येथे चार चाकी व जड वाहन पार्किंग बंद करण्यात यावे, दिवाळीचं सन असल्याने शहरातील गटारीची स्वच्छता, वेळेत पाणीपुरवठा, कचरा उचलणे याबाबत अधिकार्यांचे लक्ष देणे गरजेचे आहे, तरी वरील सर्व प्रश्न त्वरित विविध विभागाकडून मार्गी लावावे, याबाबत निवेदन देताना नगरपरिषदेचे शिंदे यांना नेवदन देण्यात आले. यावेळी शहर प्रमुख योगेश पवार, उपतालुकाप्रमुख प्रवीण घाडगे, सिद्धाराम माळी, भरत राजेगावकर, वरून चव्हाण व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी शहर प्रमुख योगेश पवार बोलताना म्हणाले लवकरात लवकर जातीने लक्ष घालून काम करावे अन्यथा तीव्र सेना स्टाईलने रस्त्यावर उतरेल असा इशरा देण्यात आला आहे.