वागदरी वॉर्ड क्र.1 मध्ये काका-पुतळण्याची काटेकी टक्कर

। वागदरी : नागप्पा अष्टगी
वागदरी ग्रामपंचायत निवडणुक वातावरण तापत चालला आहे. वार्ड एक मध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण सोनकावडे व त्यांचे पुतणे सिध्दाराम सोनकावडे यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. तर काका पुण्याला बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी, इंडे, बनसोडे व पात्रे यांनी प्रयत्न सुरू आहे.
वागदरी ग्रामपंचायत रणधुमाळीत अनेक वार्डात मित्र, नातेवाईक, भावा भावात लढत पाहायला मिळत आहे. निवडणुक वातावरण तापत चालला आहे. बहुतेक वार्डात प्रचार सुरू झाली आहे. मात्र खरी लढत वार्ड एक मध्ये पाहायला मिळत आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण सोनकावडे व त्यांचे पुतण्या सिध्दाराम सोनकावडे यांच्यात अट्टी तट्टीची लढत आहे. निवडणुक अगोदर दोघामध्ये समेट घडवुन आणण्यासाठी प्रयत्न झाला मात्र कोणीच मागे हटेना त्यामुळे काका पुतण्यात लढत सुरू आहे. मात्र या दोघांच्या भांडणाचा लाभ घेण्यासाठी रवि वरनाळे पॅनलचा उमेदवार उमेश बनसोडे, अपक्ष उमेदवार श्रीकांत इंडे व शिवकांत पात्रे यांनी जोरदार तयारी सुरू केले आहे. प्रत्येक ठिकाणी डोर टु डोर प्रचार सुरू केले आहे. गावाच्या विकाससाठी काय स्वप्न आहे हे नागरिकांना पाठवुन सांगत आहे. त्याच प्रमाणे वार्डाचा संपूर्ण विकाससाठी मतदान करण्याची विनंती आहेत.
काका आणि पुतण्यानी देखील हायटेक प्रचार यंत्रणा राबवित आहे. मतदारापर्यंत जाऊन मत याचना करीत आहेत. पॅनल प्रमुख श्रीशैल ठोंबरे, पंचायत समिति सदस्य गुंडप्पा पोमाजी, परमेश्वर पोमाजी, लक्ष्मण मंगाणे, सुनिल सावंत, संतोष पोमाजी व पॅनलचे कार्यकर्ते कामाला लागले आहे. शेवटी मतदार कौल कोणाला देणार या कडे लक्ष लागुन आहे.