वागदरी येथे विजयादशमी साधेपणाने संपन्न

। वागदरी : प्रतिनिधी
वागदरी गावाच्या इतिहासात या वर्षी प्रथमच कोरोना महामारीमुळे अंबाभवानी उत्सव सिमोल्लघंन व पालखी विना अंत्यत सादे पणाने संपन्न झाला.
या वर्षी कोरोना महामारीमुळे सर्वच सण उत्सव, समारंभ अंत्यत सादेपणाने व शासनाच्या सर्व नियमाचे काटेखोरपणे अंमलबजावणी करत साजरा करावा लागत आहे. सध्या अजुन देवालयाचे दरवाजे भक्ताच्या दर्शनासाठी बंदच आहेत. त्यामुळे सरकारवर टिका टिपणी होत आहे, आंदोलन होत आहे परंतु महाराष्ट्र सरकार अद्याप मंदिराचे दरवाजे उघडण्यास अनुमती दिले नाही. त्यामुळे नवरात्रीचा सण सर्वत्र अंत्यत सादे पणाने साजरा झाला. कुठेलेही धार्मिक कार्यक्रम होऊ शकले नाही.
वागदरी येथील ऐतिहासिक अंबाभवानी मंदिरात दसरा निमित्त पहाटे 5 वाजता मंदिराचे पूजारी शरद पोतदार, स्वामीराव यादव यांच्या हस्ते श्री ची मूर्तिला महाभिषक संपन्न झाला. गावातील देवी भक्तांनी सकाळपासुन मंदिरात दर्शनासाठी येताना दिसुन आले. मात्र मुख्य दरवाजा बंद असल्यामुळे बाहेरून दर्शन घेत होते. अबाल, वृध्द स्त्री पुरूष नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी आपटीचे पाने देवुन शुभेच्छा देत होते. सिमोल्लघंन व पालखी कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी सकाळपासुन आपटीचे पाने देण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र कोरोनाचा संकट सर्वत्र जाणवत होता.