वागदरी येथील युवकांनी दिले,जखमी मोराला जीवनदान

। वागदरी : प्रतिनिधी
वागदरी येथील अनिल सपुरे या तरूणांने राष्ट्रीय पक्षी असणार्या जखमी मोराला औषधोपचार करून जीवदान दिले. वन्य पक्ष्यांबाबत दाखवलेले औदार्य व आपुलकी पाहून परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
वागदरी महाराष्ट्र कर्नाटक सिमे लगत महामार्गावर भरधाव मोटार सायकलने वन्य प्राणी मोराला धडक दिल्याने मोर जखमी अवस्थेत पडून होता. वागदरी यीवक अनिल सपुरे पाहून मोरास उचलून बाजूला केले व त्याला पाणी पाजले. अनिल ताबडतोब गावातील काही नागरिक तंटामुक्ती अध्यक्ष राजू यादव यांना फोन मोरा बदल माहिती दिले. यादव यांनी वन विभागाशी संपर्क साधून अधिकार्यांना माहिती दिली. तोपर्यंत वागदरी येथील बसवराज पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष राजू यादव, सुरेश कलशेट्टी व सर्कल कांबळे यांनी मोराला गाडीने राजू यादव यांच्या घरी आणले व पाणी व अन्न दिले. वन विभगाचे कर्मचारी अमोल देडे, बाबू कालिभते, अंबादास जाधव यांच्या कडे जखमी मोरास सोपवले पुढील औषध उपचार वन विभाग करणार आहे.
वागदरी व परिसरात मोर व लांडोरांच्या संख्येत वाढ झाली आहे. माणुसकीच्या भावनेने या जखमी मोराला ग्रामस्थांनी जीवदान देण्याचा केलेला प्रयत्न इतरांना प्रेरणादायी असल्याचे बोलले जात आहे.