वागदरी ग्रामपंचायत निवडणुक : ढोपरे, वरनाळे ठोंबरे व पोमाजी यांच्या पॅनलमध्ये काट्याची टक्कर

। अक्कलकोट : प्रतिनिधी
वागदरी ग्रामपंचायत निवडणुक वातावरण तापत चालला आहे. दोन्ही पॅनलचे प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. होम टु होम प्रचारावर भर असुन, गल्ली बोळातुन कार्यकर्ते दिवस रात्र एक करून फिरताना दिसत आहे. ढोपरे, वरनाळे व ठोंबरे व पोमाजी पॅनल मध्ये लढत होत आहे. तर शिवराज पोमाजी यांनी अपक्ष तीन उमेदवार वार्ड 4 मध्ये रिंगणात उतरविल्याने जब्बरदस्त आवाहन दिले आहे.
वार्ड 1 मध्ये तीन एस एस दोन स्त्री व एक पुरूष असा रचना आहे. या ठिकाणी माजी मुख्याध्यापक लक्ष्मण सोनकावडे, सिध्दाराम सोनकावडे, उमेश बनसोडे व श्रीकांत इंडे, शिवकांत पात्रे, यांच्यात तर महिला गटातुन माजी जि प सदस्या सिंधुताई सोनकावडे, जगदेवी मुरळी व सौ रेखा कुंबळे यांच्यात काट्याची टक्कर होत आहे. एक अर्ज अपात्र झाल्यामुळे दोन जागेसाठी 3 च उमेदवार आहेत. प्रथम क्रमांक मते व द्वितीय क्रमांक मते कोणाला मिळतील ते विजयी होणार आहे. वार्ड क्रमांक 2 मध्ये एकुण सदस्य संख्या 3 आहे. यात एक सर्वसाधरण पुरूष, एक ओबीसी महिला व सर्वसाधरण महिला आहे. सर्वसाधरण पुरूष मधुन माजी जि प सदस्य विजयकुमार ढोपरे यांचे बंधु वसंत ढोपरे व मेजर राजकुमार हुग्गे यांच्यात सरळ लढत होत आहे. ओबीसी महिला मधुन शारदाबाई रोटे व माजी सरपंच लोचना सुतार याच्यात लढत होत आहे. सर्वसाधरण महिला गटातुन महानंदा शंकर सावंत बिनविरोध झाले आहे. माजी सरपंच विजयकुमार ढोपरे यांचे बाल्लेकिल्ला असुन सतत सात वेळा निवडून येण्याचा पराक्रम केले आहे.
वार्ड 3 मध्ये सदस्य संख्या 3 असुन एक ओबीसी पुरूष, एक जनरल महिला व जनरल पुरूष असा रचना आहे. ओबीसी पुरूष मधुन सेवानिवृत्त केंद्रप्रमुख हनिफ मुल्ला व सिध्दाराम कोळी यांच्यात सरळ लढत होत आहे. तर सर्वसाधरण पुरूष गटातुन माजी ग्रा प सदस्य श्रीशैल ठोंबरे, विजयकुमार निंबाळे व मौल्ला मंडाले याच्यात लढत होत आहे. सर्वसाधरण महिला गटातुन सौ अंबुबाई चंद्रकांत मंगाणे, श्रीमती धुळव्वा सुभाष खसगी व सौ भाग्यश्री बसवराज घुगरे यांच्यात लढत होत आहे. हा मतदार संघ मंगाणे यांचे बाल्लेकिल्ला आहे.
वार्ड क्रमांक 4 मध्ये अटीतटीची लढत अपेक्षित आहे. या ठिकाणी सर्व साधारण पुरूष गटातुन संतोष पोमाजी, श्रीकांत भैरामडगी, शरणकुमार भरमदे, पिंटु गावडे यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. तर सर्वसाधरण महिला गटातुन सौ गंगूबाई पोमाजी, सौ सुजाता पोमाजी व महादेवी पोमाजी (बंगरगी ) यांच्यात लढत होत आहे. ओबीसी गटातुन सुतार बंधु सोमा सुतार व पंकज मलकप्पा सुतार यांच्यात सरळ लढत होत आहे. वार्ड 5 मध्ये आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांचे कट्टर समर्थक तथा माजी ग्रा प सदस्य सुनिल सावंत, शिवानंद घोळसगांव व महादेव पोमाजी यांच्यात काट्याची लढत होत आहे. ओबीसी मधुन कावेरी नंजुडे (दुर्गे ), प्रभावती शिरगण ( हुलगेरी ) यांच्यात सरळ लढत होत आहे तर सर्वसाधारण महिला गटातुन माजी तंटामुक्त अध्यक्षा लक्ष्मीबाई पोमाजी व गोदाबाई बिराजदार यांच्यात रंगतदार मुकाबला होत आहे.
या निवडणुकीत दोन पॅनल तयार झाले आहे. माजी सरपंच रविकिरण वरनाळे, विजयकुमार ढोपरे, सुधीर सोनकावडे, रतन बंगरगी, उमेश पोमाजी यांच्या नेतृत्वाखाली श्री हर हर शंभु परमेश्वर ग्रामविकास पॅनल व पंचायत समिती सदस्य गुंडप्पा पोमाजी, श्रीशैल ठोंबरे, सुनिल सावंत, संतोष पोमाजी, परमेश्वर पोमाजी यांच्या नेतृत्वाखाली श्री परमेश्वर ग्रामविकास पॅनल तर तालुका युवक कॉग्रेस उपाध्यक्ष शिवराज पोमाजी यांनी अपक्षाचा एक गट निवडणुक रिगणगात उभे आहे त्यामुळे निवडणुक रंगतदार होणार आहे.