वागदरी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तरूण वर्गाचा सहभाग

। वागदरी : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामपंचायत निवडणुक रणधुमाळी सुरू झाली असुन, बंडोबाला थंड करण्याचे काम यु़ध्द पातळीवर सुरू आहे. 15 जागेसाठी 56 अर्ज दाखल झाले होते. एक अर्ज नामंजुर झाला.
वागदरी ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध होणार नाही. आता आरपार की लढाई म्हणुन यंदा मोठ्या प्रमाणात तरूण वर्ग उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दि. 4 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवडचा दिवस आहे. त्यामुळे अनेक नेते आपआपल्या मर्जीतील उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी साकडे घालत आहेत. जेणेकरून बंडखोरी होऊ नये व सरळ लढत व्हावा या मागील हेतु आहे. परंतु अनेक जण ताटर भूमिका घेऊन अर्ज मागे घेणार नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे पॅनल प्रमुखाचे डोके दु:खी वाढला आहे.
यंदाच्या पंच वार्षिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात तरूणानी अर्ज सादर केले आहे. त्यामुळे निवडणुक रंगतदार व प्रतिष्ठेची होणार आहे. सरपंच पद आरक्षण निवडणुक नंतर जाहिर होणार असल्यामुळे पॅनल प्रमुखाचे झोप उडाला आहे. निवडणुका म्हणजे खर्चाचा आहे. 15 दिवस कार्यकर्त्यांना सांभाळणे अवघड काम आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून रणनिती आखताना दिसुन येत आहे. मात्र तरूण वर्गात उत्साह जास्त आहे. काही बोटावर मोजणे इतकेच वयस्कार आहेत. सुनिल सावंत, शिवा घोळसगांव व महादेव पोमाजी यांच्या वार्ड 5 मध्ये लक्षवेधी लढत ठरणार कारण कोणीच उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार नाही. तर वार्ड 1 मध्ये माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण सोनकावडे व सिध्दाराम सोनकावडे या काका पुतण्यात लढत रंगणार आहे. वार्ड क्रमांक 3 व 4 मध्ये अटीतटीची लढत अपेक्षित आहे.
या बाबत दि. 4 रोजी चित्र स्पष्ट होणार आहे. आ. सचिन कल्याणशट्टी यांचे कट्टर समर्थक सुनिल सावंत, संतोष पोमाजी, प्रकाश पोमाजी निवडणुक रिगणगात आहेत. त्यांच्याकडे सर्वाचे लक्ष लागुन आहे.