रेवणसिध्द शिवरशरण महास्वामीजी जयंती महोत्सव रद्द

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट संस्थांनचे राजगुरु रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजीचा 159 वा जयंती महोत्सव मंगळवार, दि.12 जानेवारी 2021 रोजी असून यंदाच्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशामुळे यंदाचा जयंती महोत्सव रद्द करण्यात आले आहे. यंदाचे जयंती महोत्सव फक्त नैसर्गिक पद्धतीने शरण मठाचे मठाधिश श्री सदगुरु चिक्करेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी च्या हस्ते पूजा करून पार पाडण्यात येणार आहे. सदर दिवशी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.तरी दर्शनासाठी मंदिराकडे कोणीही भाविकांनी येऊ नये असे आवाहन शरण मठाचे चेअरमन माणिकराव निलगार यांनी प्रसिद्ध पत्राद्धारे कळविले आहे.