राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन विभागात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार

Akkalkot-basalegoan road

भूसंपादन अधिकारी दीपक शिंदे यांची विभागीय चौकशी करा : अविनाश मडिखांबे

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट गुलबर्गा राष्ट्रीय महामार्ग क्र 150 चे भूसंपादन कामी अनेक शेतकर्‍यांच्या शेत जमिनी अधिग्रहित करण्यात येऊन त्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती यापैकी अक्कलकोट तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांना त्यांची नुकसान भरपाई मिळणे कामी दीपक शिंदे उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र 1 सोलापूर यांनी शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणुक केली आहे.

व केवळ आर्थिक रकमा दिलेल्या शेतकर्‍यांचेच कामे करण्यात आली. असुन ज्यांनी रकमा दिलेल्या नाहीत त्यांची प्रकरणे अद्यापि प्रलंबित ठेवण्यात आली. काही शेतकर्‍यांना अत्यंत विलंबित रकमा दिल्याने त्या शेतकर्‍यांना मोठी नुकसान सहन करावे लागले आहे अनेकांना शासन दरबारी अनेक हेलपाटे माराव्या लागल्या आहेत. मनस्ताप सहन करावा लागला आहे व तसेच काही शेतकर्‍यांचे शेतजमिनी ह्या एन ए प्रकारात नसताना सुद्धा त्याच कालावधीत एन. ए. करुन घेऊन शेतकर्‍यांकडून पैसे घेऊन त्यांना वाढीव नुकसान भरपाई मिळुन देण्यात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.
तरी या बाबत बहुतांश शेतकर्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. याला सर्वस्वी दीपक शिंदे हे अधिकारीच जबाबदार आहेत. तरी त्यांची विभागीय चौकशी करून त्यांना कठोर शासन करण्यात यावे व झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाईची शेतकर्‍यांना त्वरित मिळवून द्यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने मोठे आंदोल उभारू असे निवेदन पर मागणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी दिली आहे.

About Author