राजेफत्तेसिंह चौक नवरात्र महोत्सव मंडळाच्यावतीने सफाई कर्मचार्यांना साडी-चोळीचे वाटप

। अक्कलकोट : प्रतिनिधी
सध्याच्या परिस्थितीत जगावर कोरोनाचे संकट आहे; आई तुळजाभवानीच्या आशिर्वादाने त्याचे प्रमाण कमी होत चालले असले तरी काळजी घेणे गरजेचे आहे, त्यामुळेच विविध सण, वार, उत्सवावर निर्बंध आहेत. हे ही भविष्यात शिथिल होतीलच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजे फत्तेसिंह चौक नवरात्र मंडळाने नगरपरिषदेच्या 53 महिला सफाई कर्मचार्यांना साडी-चोळीचे वाटप केले आहेत. नेहमीच हे मंडळ धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन श्री वटवृक्ष देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी केले.
शनिवारी अक्कलकोट नगरपरिषदेच्या आवारात नवरात्र दसरा निमित्त नगरपरिषदेच्या 53 सफाई महिला कर्मचार्यांना मंडळाच्यावतीने साड्या वाटपाचा छोटेखानी कार्यक्रम कोरानाचे सर्व ते नियम पाळत करण्यात आला. याप्रसंगी महेश इंगळे हे बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान पोलिस निरीक्षक कलप्पा पुजारी हे होते.
या कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, नगरसेविका सोनाली शिंदे, सतिश शिरसट, मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी वासु कडबगावकर, कल्याण देशमुख, सागर गोंडाळ, सनी सोनटक्के, रोहित निंबाळकर, समर्थ शिरसाट, शिवा मंगरुळे, आनंद फडतरे, प्रसन्न गवळी, चिन्मय हुंबे, अनंत क्षिरसागर, युवराज सोनटक्के, यश जाधव, प्रथमेश पाटील, आकाश गंगणे, आकाश तुवर, सुरज निंबाळकर, बाबुशा भालके, गणेश सोनटक्के, विशाल बिराजदार, प्रसन्न शिंदे, रणजित गोंडाळ, आदित्य शिंदे, गणेश ग्राम, विकास गडदे, बसवराज धोडमनी, बसवराज मंगरुळे, गोटु माने आदीजण उपस्थित होते.