राजश्री नरुणे राज्यस्तरीय वचन कम्मठ परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक

mangrule

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट के.एल.ई. संचालित मंगरुळे प्रशाल अक्कलकोट येथील विद्ययार्थी नी कुमारी राजश्री शिवराया नरुणे हिला कर्नाटक राज्यातील चित्रदूर्ग येथील श्री मुरुघा मठ कडून राज्यस्तरीय वचन कम्मठ परीक्षा घेण्यात आले होते. या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावले आहे. तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापक गिरीष पट्टेद यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार व प्रशालेच्या शिक्षक मल्लिनाथ यशवंत पाटील यांना राज्य स्तरीय आदर्श शिक्षक श्री पुरस्कार याच मठा कडून जाहिर झाला असून त्यांना 23 ऑक्टोबर रोजी चित्रदूर्ग च्य मठात श्री मठाच्या महागुरू डॉ शिवमूर्ती मुरुघा शरणरु ,चित्रदूर्ग चे नगर आयुक्त हणमंतप्पा व आंबिगर चौडय्या पिठाचे प्रमुख शांतभिसम स्वामीजी यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.
के.एल.ई. चे चेरमन डॉ प्रभाकर कोरे, सदस्य अनिल पट्टेद, शिवानंद शिरगावे, प्रशांत कोले, अनिल पाटील, व प्रशालेच्या मुख्याध्यापक जी बी पट्टेद, के चितली, सी.डी. जोकरे, सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी समूह अभिनंदन केले आहेत.

About Author