मौजे बर्हाणपूर येथे धम्मचक्र परिवर्तन दिन मोठया उत्साहात संपन्न

। बर्हाणपूर : प्रतिनिधी
येथे 64 वा धम्मचक्र परिवर्तन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कय्युम पिरजादे, संदीप मडीखांबे, शिलामणी बनसोडे, अर्जुन बनसोडे व उपास्थित मान्यवरांच्या हस्ते बुध्दवंदना घेऊन करण्यात आले. कोरोना लॉकडाऊनच्या काळात प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, दक्षता समितीमधील सभासद, सामाजिक सेवाभावी संस्था, व पत्रकार बंधूना त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सत्यशिल तरूण मंडळाच्या वतीने गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत बाळासाहेब बनसोडे यांनी धम्मचक्र परिवर्तन दिन व विजयादशमीचे महत्व सांगितले. यावेळी शिव बसव बी आर आंबेडकर बहुद्देशीय संस्था अध्यक्ष संदीप मडीखांबे, भीमप्रकाश बहुद्देशीय संस्था अध्यक्ष शिलामणी बनसोडे, नेहरू युवा केंद्र अक्कलकोट समन्वयक प्रा. गौतम बाळशंकर, प्रविण हताळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्य क्रमासाठी इमामोद्दीन पिरजादे, अशरफ पटेल, साजेदा पटेल, उत्तम बनसोडे, विजयकुमार बनसोडे, सुनील ब-हाणपूरकर,सिद्धाराम हत्तुरे, गणेश बनसोडे, सुनील बनसोडे, स्वप्निल बर्हाणपुरकर, रमेश बनसोडे, विकास बनसोडे, अक्षय बनसोडे, परमेश्वर बनसोडे व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे आभार दीपक बनसोडे यांनी मानले.