मैंदर्गी नगरपरिषदेकडून शहरात स्वच्छतेप्रती विविध स्पर्धेतून जनजागृती

। मैंदर्गी : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेप्रती जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने मैंदर्गी नगरपरिषदेने स्वच्छ हॉटेल, स्वच्छ शाळा, स्वच्छ ऑफिस, चित्रकला, रांगोळी, निबंध, भाषण तसेच महिलांसाठी खास होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे मैंदर्गी नगरपरिषदेमध्ये बक्षीस वितरण पार पडले.
होम मिनिस्टर मधील विजेत्या महिलांना प्रथम क्रमांकास पैठणी द्वितीय क्रमांकास सोन्याची नाथ व तृतीय क्रमांकास चांदीची अंगठी देऊन गौरविण्यात आले. मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, नगराध्यक्षा दिप्ती केसुर तसेच उपनगराध्यक्षा राजश्री निंबाळ व नगरसेवक यांच्या उपस्थितीत विजेत्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
मैंदर्गी शहरवासीयांना जनजागृती करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. आपले शहर स्वच्छ व सुंदर राहायचे असेल तर प्रत्येक नागरिकांचा मानसिकतेत बदल होणे अनिवार्य आहे या साठी अशा स्पर्धेतून जनजागृती करण्याचा प्रयत्न असतो व अशा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना व्यासपीठ उपलब्ध होते असे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी सांगितले. मैंदर्गी शहरास स्वच्छ, सुंदर व हरित बनवण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावे असे आवाहन नगरपरिषद तर्फे करण्यात आले. या कार्यक्रमास मैंदर्गी नागरपरिषदचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, शहर समन्वयक श्वेता धुमाळ तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका, नगराध्यक्षा दिप्ती केसुर उपनगराध्यक्षा राजश्री निंबाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विजेते पुढील प्रमाणे : चित्रकला प्रथम क्रमांक पल्लवी येळसंगी द्वितीय क्रमांक सुमित्रा सिंदगी तृतीय क्रमांक सौम्या झंगी.
निबंध प्रथम क्रमांक श्रुतिका गुंडद द्वितीय क्रमांक कावेरी लोणी तृतीय क्रमांक बसम्मा देशमुख
भाषण प्रथम क्रमांक भाग्यलक्ष्मी काळी द्वितीय क्रमांक स्वलहा बेग तृतीय कावेरी लोणी
रांगोळी प्रथम क्रमांक सुमन मसूती द्वितीय क्रमांक सुमित्रा सिंदगी तृतीय क्रमांक श्रद्धा पाटील
स्वच्छ शाळा प्रथम क्रमांक इरा स्कूल द्वितीय क्रमांक शिवचलेश्वर हाय स्कूल तृतीय क्रमांक आदर्श स्कूल.
स्वच्छ ऑफिस प्रथम क्रमांक बँक ऑफ महाराष्ट्र द्वितीय क्रमांक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.