मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी यांना ड्रीम राष्ट्रउभारणी प्रेरणा पुरस्कार

Kattimani sir

। अक्कलकोट : प्रतिनिधी
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती, वाचन प्रेरणा दिन, वृत्तपत्र दिन आणि जागतिक विद्यार्थी दिनानिमित्त ड्रीम फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्ती व संस्थेला डॉ. कलाम राष्ट्रउभारणी प्रेरणा पुरस्कार ज्येष्ठ संशोधक प्रा. व्यंकटेश गंभीर व दिवाकर रेळेकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. श्रुतीश्री वडकबाळकर, प्राचार्य अंबादास पांढरे, रिगल कॉलेजचे सागर अक्कलकोटे, बाजार समितीचे संचालक सिद्धाराम चाकोते, ड्रीम फाउंडेशनच्या सचिवा संगीता भतगुणकी-पाटील आदी उपस्थित होते. कृषी क्षेत्र- विजयकुमार बरबडे, सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, उद्योगपती महादेव कोगनुरे, गिरीकर्णिका फाऊंडेशन विजय कुंदन जाधव, मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी, शिक्षिका शांता तोळणुर, संजय अर्धापुरे, सिद्धेश्वर कुरे, प्रकाश चव्हाण, अजित पाटील, अरविंद राठोड, वैभव कुलकर्णी, सागर नरोणी यांना पुरस्कार देण्यात आले. सन्मानचिन्ह सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, फेटा, ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरुप होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांनी केले.

About Author