माळी महासंघ व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

mali

। अक्कलकोट, प्रतिनिधी
माळी महासंघाचे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माळी महासंघाचे अध्यक्ष संतोष पराणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया आठवले तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, शहर परमेश्वर बोदले, प्रकाश कानाळ, सुरेश गायकवाड, महादेव अडवितोटे, समर्थ पराणे आदी उपस्थित होते.
यावेळी संतोष पराणे व अविनाश मडिखांबे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष संतोष पराणे बोलताना म्हणाले की 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर, त्यांच्या अनुयायांसह सावित्रीबाई फुले यांनी पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची अपूर्ण कामे पूर्ण करुन सत्य शोधक समाज दूरदूरपर्यंत पसरविला.1897 मध्ये पुण्यात एक भयानक प्लेग ची साथ पसरली प्लेगच्या रूग्णांची सेवा करत असताना सावित्रीबाई फुले स्वत: देखील प्लेगच्या बळी पडल्या आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले.
त्यावेळी ही सर्व कामे करणे इतके सोपे नव्हते जितके ते आज वाटते. समाजातील अनेक अडचणी व तीव्र विरोध असूनही, महिलांचे जीवनमान आणि शिक्षण सुधारण्यासाठी व रूढीवादी प्रथा सुधारण्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल देश नेहमी सावित्रीबाई फुले यांचे ऋणी आह.
अविनाश मडिखांबे यांनी बोलताना म्हणाले की महिलांच्या शिक्षणासह विधवांची दुर्दैवी परिस्थिती पाहता त्यांनी विधवा पुनर्विवाह सुरू केले आणि 1854 मध्ये विधवांसाठी आश्रम बांधले. स्त्री-बालहत्या रोखण्यासाठी त्यांनी नवजात मुलांसाठी एक आश्रमही उघडला. आज देशात स्त्री भ्रूणहत्येचा वाढता कल पाहता त्या काळात स्त्री-बालहत्याच्या समस्येवर लक्ष केंद्रित करणे आणि ते थांबवण्याचा प्रयत्न करणे किती महत्त्वाचे होते, हे समजून येते विधवांची अवस्था सुधारण्यासाठी तसेच विधवांची सती प्रथा रोखण्यासाठी,पुनर्विवाह साठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. सावित्रीबाई फुले यांनी पतीसमवेत काशिबाई नावाच्या गरोदर विधवा महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखलेच नाही तर तिला आपल्या घरीच ठेवले आणि तिची काळजी घेतली आणि वेळेवर तिची प्रसुती केली. नंतर त्यांनी तिचा मुलगा यशवंत यांना दत्तक म्हणून घेतले आणि त्याला चांगले शिक्षण दिले जो नंतर एक प्रसिद्ध डॉक्टर बनला असे मत अविनाश मडिखांबे यांनी व्यक्त केले.

About Author