महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणार : शटगार

। अक्कलकोट : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील महिलांन यंदाच्या वर्षी चारचाकी वाहन चालविर्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय शिलाई मशिनऐवजी यंदा पिको फॉल मशिन खरेदीसाठी लाभार्थ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जि.प. महिला व बालकल्याण समितीची सभापती स्वाती शटगार यांनी दिली.
सोमवारी जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण समितीची सभा घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. कोरोना परिस्थितीमुळे महिला व बालकल्याण विभागाचे यंदा 50 टक्के बजेट कमी झाले. वाढीव निधीची मागणी ही जि.प. अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांच्याकडे करण्यात आल्याचे शटगार यांनी सांगितले.
महिला व बालकल्याण विभागाकडून चालू आर्थिक वर्षात 20 लाखांचा निधीतून महिलांना पिको फॉल खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. महिलांना वाहन चालविर्याचे प्रशिक्षण देण्यासाठी दोन लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मुलींना एमएस.सीआयटी व टॅलीचे संगजणकीय प्रशिक्षण देण्यासाठी 29 लाख, कराटे प्रशिक्षणासाठी 15 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्याचीही योजना सुरू केली जाईल. यापूर्वी या विभागातून घेण्यात येण्यार्या मुलींना सायकल खरेदीसाठी अनुदान वाटप करणे व शिलाई मशिन खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना बंद करण्यात आली आहे. पिठाच्या गिरणीऐवजी यदांच्या वर्षी मिरची कांडप यंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याचाही निर्णय समितीत घेर्यात आल्याचे सभापती शटगार यांनी सांगितले.