महावितरण कर्मचार्‍यांना कोरोना योध्याचे सन्मानपत्र देऊन गौरव

MAHAVITARAN

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पुण्यनगरीत लॉकडाऊन मध्ये कोविड-19 च्या काळातमागील सहा सात महिन्यांपासून कर्तव्य बजावणार्‍या महावितरण कर्मचारीचे (कोरोना योध्यांचे) मनोबल उंचावण्यासाठी साई समर्थ नगर वसाहत कल्याणकारी संस्था पिरजादे प्लॉट बासलेगाव रोड अक्कलकोट यांच्या वतीने शाल, श्रीपळ, कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कोरोना महामारी (कोविड-19) महामारीने सोलापूरसह भारत देश आणि जगभरात थैमान घातले.
आरोग्याच्या भीषण संकट काळात ही आपण जीव धोक्यात घालून सेवावृत्तीने कार्यरत राहिलात, जागतिक व राष्ट्रीय आपत्ती काळात धैर्याने कार्य बजावलात,
आपल्या योगदानामुळे कोरोना विरुद्धच्या लढाईत सहकार्य लाभले. आदर्श महावितरण कर्मचारी म्हणून आपण बजावलेले कर्तव्य माणुसकी आणि सामाजिक जाणिवेचे तर आहेत आणि स्पृहणी कार्य ही आहे आपल्या या उत्स्फुर्त सेवा, आदर्श कार्यासाठी विशेष नोंद घेऊन आपणास हे सन्मानपत्र देऊन आपल्या कार्याचा गौरव करीत आहोत. असे संस्थेचे सचिव अश्पाक मुल्ला यांनी म्हटले आहे
अक्कलकोट उपविभागीय कार्यालया अंतर्गत शहर व ग्रामीण विभागातील आपल्या कार्यालयीन ठिकाणी आपले कर्तव्य बजावणारे महावितरण कर्मचारी या सर्वांच्या अमूल्य कार्याचे कौतुक करण्याच्या हेतूनेसर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आज पिरजादे प्लॉट बासलेगाव रोड येथील साई समर्थ नगर वसाहत कल्याणकारी संस्थेच्यावतीने कर्मचार्‍यांना कोरोना योद्धा सन्मानित करण्यात आले .
या अभिनव व प्रेरणादायी उपक्रमाबद्दल अक्कलकोट येथील उपकार्यकारी अभियंता संजीवकुमार म्हेत्रे, कनिष्ठ अभियंता एस. व्ही. किरनळळी, सहाय्यक अभियंता अक्कलकोट शहर कुणाल माळवदे, सहाय्यक अभियंता हर्षवर्धन पाटील, सहाय्यक लेखापाल लक्ष्मीपुत्र जवळगे, एस. बी. नरुणे, वरिष्ठ तंत्रज्ञ बलभीम मुळे, वरिष्ठ तंत्रज्ञ फिरोज मणियार, वरिष्ठ तंत्रज्ञ कमलेश जाधव, बिलाल चाऊस, लिपिक एन. पी. नवगिरे, तंत्रज्ञ राम मजगे, शिपाई मधुमती अंकुश, वाहन चालक हरून जमादार या सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे सन्मान पत्र देऊन स्वागत केल्या नंतर समाधान व्यक्त करत या सत्कार सोहळ्यामुळे आम्हाला नवा उत्साह व नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी निखिल झगे, सुरेश कवठगी स्वामींनाथ बाबर, कैलाश सुरवसे, हेमंत कुलकर्णी, शिवशंकर स्वामीं अश्पाक शेख, सचिन साळुंखे, लक्ष्मीपुत्र लोणी, किरण जाधव (मेजर), सुभाष बकरे, या सह साई समर्थ नगर वसाहत कल्याणकारी संस्था येथील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सर्व सदस्य आदी जण उपस्थित होते.

 

About Author