भाजपा युमोचे राष्ट्री अध्यक्ष खा.तेजस्वी सुर्या यांची आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी घेतली भेट

। अक्कलकोट : प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सुर्या यांची बंगळुरु येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भेट घेतले.
सतत मतदारसंघाच्या विकासासह भाजप पक्षाचे कार्य तेवत ठेवण्यामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव जिल्ह्यात अग्रस्थानी आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थिती मतदारसंघातील नागरिकांना विविध सोयी उपलब्ध करुन देण्याकामी आ.सचिन कल्याणशेट्टी हे रात्रीचा दिवस केल्याने शासकीय यंत्रणा हलल्याने अनेक संकटे दूर झाली. अक्कलकोटच्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पुनर्वसनमंत्री, पालकमंत्री यांना देखील दखल घ्यावे लागले होते. हे सर्व पाहणी करिता अक्कलकोट दौर्यावर आले होते.
तालुक्यावर आलेले संकट दूर झाल्यानंतर आ.कल्याणशेट्टी हे बंगळुरु येथे जाऊन भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांची बंगळुरु येथील कार्यालयात भेट घेतली व श्रीक्षेत्र अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता व पक्ष कार्यक्रमाकरिता येण्याचे आमंत्रण दिले.
या भेटी तालुका, जिल्हा, विभाग, राज्यासह राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, पक्ष कार्यालयाची चर्चा खा.सुर्या व आ.कल्याणशेट्टी यांच्यात झाली. याप्रसंगी आ.कल्याणशेट्टी यांनी राष्ट्रीय स्तरावरील भाजपा युमोच्या कार्याबाबत देखील जाणून घेतले.
जिल्ह्यातच सतत कार्यमग्न आमदार म्हणून सचिन कल्याणशेट्टी हे ओळखले जातात. त्यांच्या वर्षभरातील कारकिर्दीतीली कामावर आम जनता समाधानी असून त्यांनी सुरु केलेले जनता दरबार जनताप्रिय आहे.