बोरेगाव येथे जनावरांच्या विविध साथीच्या रोगांवर उपचार व लसीकरण शिबीराचे आयोजन

BOREGON

। बोरेगाव : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथील ग्रामपंचायतीच्या वतीने जनावरांना लाळखुरकत व विविध रोगांवर उपचार आणि लसीकरण करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सरपंच उमाकांत गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पशुधन अधिकारी डॉ. सचिन मोरे पशुधन पर्यवेक्षक संतोष कसबे, मनोज वडगावे, शांताराम चव्हाण, गौरीशंकर खांडेकर, बसवणाप्पा पावले, भीम खांडेकर, कलाप्पा औरसंगे, मनोहर बनसोडे, यांच्यासह गावातील पशुपालक मोठ्या संख्येने शिबिरात उपस्थित होते.
तसेच या शिबिरामध्ये एकूण तीनशे सत्तेचाळीस जनावरांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी लाळखुरकत या रोगांवर 178 जनावरांना लसीकरण करण्यात आले. वंध्यत्व उपचार म्हणून 23 आणि जनऔषध 87 जनावरे तसेच गोळी उपचार म्हणून 32 जनावरे व इतर आजार म्हणून 27 जनावरे यावर उपचार करण्यात आले.

About Author