बँक ऑफ इंडिया शाखेचे अर्धशतकाकडे यशस्वी वाटचाल : नंदकुमार जगदाळे

Bank of India

। अक्कलकोट : प्रतिनिधी
गेल्या 40 वर्षात बँक ऑफ इंडिया शाखा अक्कलकोटने ग्राहकांच्या मनामनात घर केल्याने अर्धशतकाकडे यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन अक्कलकोट तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार जगदाळे यांनी केले.
ते ए-वन चौक येथील बँक ऑफ इंडिया शाखा अक्कलकोटच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त व्यवस्थापक शरणप्पा पुजारी यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलेले होते. याप्रसंगी जगदाळे हे बोलत होते.
याप्रसंगी श्रीकांत अभिवंत, विनायक लकुरे, अविनाश रुपनवर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संचालक प्रशांत भगरे, संपादक प्रविण देशमुख, अरविंद पाटील, गोविंदराव शिंदे, सिध्दाराम बिडवे, प्रकाश खांडेकर, अंकुश पवार, सचिन भेंबरे, अभय टेकाम, निखिल कुलकर्णी, संतोष सुमित, प्रभाकर जाधव, अंबादास जाधव, वंदना गजधाने, पप्पु बोरगावकर, संजय शिंदे, विजय कवंची, वैभव स्वामी, शशिककांत कुंभार आीजण उपस्थित होते.

About Author