फारुक शाब्दी यांची बिहार प्रचार प्रमुखपदी नियुक्ती

। अक्कलकोट : प्रतिनिधी
बिहार विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे; बिहारमधील एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूर शहर एमआयएमचे अध्यक्ष फारुक शाब्दी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी शाब्दी यांच्यावर बिहारमधील किशनगंज भागातील उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे.
एमआयएमच्यावतीने बिहार विधानसभेच्या 29 जागा लढविण्यात येत आहेत. बिहारमध्ये एमआयएमने एसजेडी, बीएसपी, आरएलएसपी यांच्यासोबत आघाडी केली आहे. या आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूर एमआयएमचे शहर अध्यक्ष फारुक शाब्दी हे शुक्रवार, 23 रोजी बिहारला रवाना झाले आहेत. शाब्दी यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत फारुक शाब्दी यांनी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात दुसर्या क्रमांकाची मते घेतली होती.