पूरग्रस्तांना त्वरित मदतीची दिली हमी

jaysidheshwar

खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी, आ.सचिनदादा कल्याणशेट्टी, तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली भेट

। हिळ्ळी : प्रतिनिधी
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, तहसीलदार अंजली मरोड, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड व इतर अन्य पदाधिकारी यांनी भीमा नदीला आलेल्या पुरामुळे हिळ्ळी भागात झालेल्या नुकसानीचा पाहणीदौरा केला. ग्रामस्थांची, शेतकर्‍यांची या पुरामुळे झालेल्या नुकसानीची शासन स्तरावरून व वैयक्तिकरीत्या त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्याकरिता प्रयत्न करण्याची हमी दिली.
हिळ्ळी गावचे व अक्कलकोट तालुका भा.ज.पा. चे सरचिटणीस परमेश्वर यादवाड यांनी पुरामुळे हिळ्ळी परिसरातील शेतकर्‍यांची, 650 हेक्टर पीका बरोबर माती वाहून गेली, 100 घरे 4 दिवस पाण्यात होते, महसूल विभागा कडून गेल्या वर्षा चे पूरग्रस्त कर्जदार शेतकर्याचे रक्कम मिळाले नसल्याचे सांगितले, तसेच जनावरांची, आबालवृद्धांची व गावकर्‍यांची झालेली दयनीय अवस्था सर्वांपुढे मांडली. वारंवार येणार्‍या पुरामुळे होणार्‍या अतोनात हानीकडे शासनाचे लक्ष वेधण्याची व तात्काळ मदत मिळवून देण्याची विनंती सर्व पदाधिकार्‍यांकडे व प्रशासनाकडे केली. पुरामुळे होत्याचे नव्हते झाले असून प्रचंड मोठ्या प्रमाणात हानी झाली असून ती शब्दात व्यक्त करण्याच्या भावनेपलीकडे असल्याचे मत आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी मांडले. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी संकटा विरुद्ध लढण्यासाठी अशा प्रसंगी सर्वांनी एकोप्याने एकमेकांना सावरण्याची, मदत करण्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले. तहसीलदार अंजली मरोड यांनी त्वरित पंचनामे करून शासन दरबारी पाठपुरावा करून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याची हमी नुकसानग्रस्त पुरग्रस्त शेतकर्‍यांना दिली.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी ऐवळे राजशेखर यादवाड, महंमदहनिफ मुजावर, अशपाक मुजावर, संगणा गुब्यड, कामगोड बाके, केशव कुलकर्णी, अशोक चपलगाव, शंकरेपा शटगार, शिवानंद बाके, संगण्णा यादवाड, गंगाधर माळगे, सिद्धापा सोलापूरे शिवयोगी पुजारी, भूताळी पुजारी आदी उपस्थित होते.

About Author