पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी शिरसी व रामपूर पूरग्रस्त भागाला दिली भेट

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अतिवृष्टी व महापूरामुळे अक्कलकोट तालुक्यात नागरिकांचे संसार उध्दस्त झाले तर हजारो हेक्टरावरील शेतातील पिके वाहून गेली या सर्व स्थितीचा तात्काळ पंचनामा करुन शासन स्तरावर प्रशासनाने अहवाल सादर करावे असे सूचना तहसिलदार अंजली मरोड यांना पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी दिले.
पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे शनिवारी अतिवृष्टी नुकसान पाहणी दौर्यानिमित्त तालुक्यातील शिरसी व रामपुर या गावी भेट देवून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्र्यांनी ग्रामस्थ व शेतकर्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आ. सिध्दाराम म्हेत्रे, तहसिलदार अंजली मरोड, गटविकास अधिकारी महादेव कोळी, शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, नगरसेवक अश्पाक बळोरगी, रासपचे जिल्हाध्यक्ष सुनिल बंडगर, भाजपाचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, रिपाईचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे, वीज वितरण शाखा अभियंता संजीवकुमार म्हेत्रे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे,आदिसह अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले दोन दिवसापुर्वी झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतीबरोबरच जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेले. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नदीकाठच्या बहुतांश गावात घराची पडझड झाली तर काहींची घरे व गुरु-ढोरे, शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हैशी वाहून गेली. वादळी वार्यासह झालेल्या पावसात विद्युत पोल उन्मळून पडल्याने नदीकाठची सर्व गावे अंधारमय झाले आहे. तरी शासकीय अधिकारी व कर्मचार्यांना ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. या पूरपरिस्थितीचा पालकमंत्र्यांनी संपूर्ण आढावा घेवून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करुन शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्याचे सूचना दिले. आपत्ग्रस्त ग्रामस्थांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन प्रसंगी पालकमंत्र्यांनी दिले.
पालकमंत्र्यांच्या पूरग्रस्त पाहणीप्रसंगी शिरसी व बोरी रामपूर येथील ग्रामस्थांनी झालेल्या नुकसानीचे पाढा वाचले. यामध्ये काहींचे कोंबड्या, शेळी, गायी, म्हैशी, उभी पिके ऊस, कांदा, तूर, सोयाबीन यासह विविध पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे सांगितले.