पदोन्नती प्रक्रिया तातडीने राबवा सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती

Gurav sir

। सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांतून विस्तारअधिकारी,केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने राबविण्याची मागणी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्याकडे सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने केली.
जिल्ह्यातील प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित पदोन्नती, विषय शिक्षक नकार मंजुरी, विज्ञान विषय शिक्षक नेमणूक, विषयशिक्षक वेतनश्रेणी, विस्थापित, रँडमग्रस्त आणि आंतरजिल्हा बदलीने गैरसोय झालेले आणि दोषमुक्त शिक्षकांना समुपदेशनाद्वारे सोयीच्या ठिकाणी पदस्थापना देणे, निवडश्रेणी या व इतर विषयांच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाली.
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीसोबत प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीच्या अनुषंगाने लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, शिक्षणाधिकारी(प्राथ.) संजयकुमार राठोड यांच्यासोबत बैठक संपन्न होणार असल्याचे सांगितले.
यावेळी शिष्टमंडळात सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा संपर्क प्रमुख मो.बा.शेख, शिक्षक नेते राजन ढवण, उम्मीद सय्यद, दयानंद चव्हाण आदी उपस्थित होते.

About Author