नाविंदगी येथे राष्ट्रीय लाळ खुरकुत लसीकरण मोहीमे अंतर्गत शिबीर संपन्न

। नाविंदगी : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथे गुरुवारी राष्ट्रीय लाळ्या खुरकुत लसीकरण मोहीमे अंतर्गत गाय ,बैल , म्हैस या जनावरांना लसीकरण करण्यात आले.
दरवर्षी जनावरांना नोव्हेंबर -डिसेंबर मध्ये लाळ्या खुरकूत साथची लागण होऊ नये म्हणून लसीकरण राबवले जाते.यावर्षी देखील गुरुवारी नाविंदगीत या लसीकरणाची मोहीम राबवण्यात आले. या प्रसंगी लसीकरणासाठी डा. बडगिरे व्हि. व्हि.(पशुधन विकास अधिकारी सोलापूर ), डा.उटगे व्हि.बी.( पशु वैद्यकीय अधिकारी जेऊर), डॉ.सरकुंडे जे.बी.(पशु वैद्यकीय अधिकारी नागणसूर) व यावेळी गावातील उपस्थिती सरपंच गायचोडे ,डे.सरपंच पंडित चव्हाण ग्रामसेवक जाधव आर.एस.,धर्मण्णा गायचोडे, चंद्रकांत हाळतोट, परिचालक दत्ता तळवार, शिपाई रेवणसिद्ध वड्डे व अनेक शेतकरी उपस्थित होते.