नदीकाठच्या शेतकर्‍यांना शासनाने विशेष मदत द्यावी : गणेश माने-देशमुख

Chapalgaon

। चपळगाव : प्रतिनिधी
मागील आठवड्यात बोरी व हरणा नदीला महापूर आला. असा कहर अनेक वर्षानंतर सर्वांनी अनुभवला. यामध्ये विशेष करुन शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. झालेले नुकसान शेतकर्‍यांसाठी धोक्याचे आहे. विशेषत: नदीकाठच्या शेतामध्ये महापूराचे पाणी मोठ्या प्रमाणावर शिरल्याने पिकांसह मातीही वाहून गेली आहे. त्यामुळे पुढील दहा वर्षापर्यंत शेतकर्‍यांना अस्मानी संकटाला जावे लागणार आहे. मात्र नदीकाठच्या शेतकर्‍यांसाठी शासनाने विशेष मदत दिल्यास तो जगणार आहे. तरी शासनाकडून अपेक्षा असल्याचे मत जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने-देशमुख यांनी व्यक्त केले.
चित्रा नक्षत्राच्या पावसाने तालुक्याच्या उत्तर भागातील नदीकाठच्या गावांमध्ये नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी बुधवारी जयहिंद शुगर परिवाराकडून बावकरवाडी, कुरनूर, चुंगी, चपळगाव आदी गावांना भेटी देण्यात आल्या. यावेळी मनोगत व्यक्त करताना गणेश माने-देशमुख बोलत होते. यावेळी जयहिंद शुगरचे मार्गदर्शन बब्रुवान माने-देशमुख, विजय पाटील, शेतकरी अधिकारी राजेंद्र जेऊरे, राहुल घुगरे, शिवकुमार पाटील, प्रहारचे जिल्हाध्यक्ष राजु चव्हाण, कुरनूरचे युवा नेते व्यंकट मोरे, ग्रा.पं.सदस्य संजय बाणेगाव, कलप्पा बडूरे, विजय कोरे, प्रशांत पाटील, युन्नूस पटेल, सलीम पटेल, अबूजर पटेल, श्रीमंत बुगडे, सिध्दु पाटील, रेवणु पाटील, राजशेखर विजापूरे, प्रशांत जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना गणेश माने-देशमुख म्हणाले, अनेक वर्षांनंतर निसर्गाचा कोप सर्वांनी अनुभवला. यामध्ये अनेकांची घरे पडली, गुरे-ढोरे पुराच्या पाण्यात वाहून गेली, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूरग्रस्त शेतकर्‍यांनी घाबरू नये.
याप्रसंगी बब्रुवान माने देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. आजपर्यंत जयहिंद शुगर्सने शेतकर्‍यांचे हित जोपासले आहे. यापुढील काळात देखील आम्ही शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शंभुलिंग अकतनाळ यांनी तर आभार विजय कोरे यांनी मानले.

About Author