धानय्या कौटगीमठ यांच्या पुस्तकातील केरळ सेट परीक्षेत 53 प्रश्न!

Dhanyya Kavatagi

। अक्कलकोट : प्रतिनिधी
केरळ सरकारच्या अंतर्गत लाल बहाद्दूर शास्त्री विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, तिरुवनंतपुरम यांनी 10 जानेवारी 2021 रोजी केरळ स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट के सेट परीक्षा एकूण 31 विषयावर राज्यातील 14 केंद्रात म्हणजे तिरुवनांतपुरम, कोलम, पटन मिठ, अलपुझा, कोट्टायम, इदुकी, येरणाकुलम, त्रिसूरा, पलकड, मलपूरम, कोझीकोडे, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड के सेट परीक्षा संपन्न झाले. या परीक्षेत पुन्हा एकदा अक्कलकोटचे शिक्षक धानय्या कौटगीमठ यांच्या पुस्तकातुन पेपर क्रमांक 1 मध्ये 17 प्रश्न आणि पेपर क्रमांक 2 इंग्रजी विषयामध्ये 36 असे एकूण 53 प्रश्न या केरळ सेट परीक्षेत पडले होते. यामुळे यावर्षी सलग वेगवेगळ्या राज्यात धानय्या यांच्या पुस्तकामधून प्रश्न येत असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी ठरत आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यातील 24 सेट, 3 नेट, 4 टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या परीक्षाचा चांगला अनुभव इतर विद्यार्थ्यांसाठी व्हावा या उद्देशाने सेट-नेट पुस्तके इंग्रजी, मराठी व कन्नड भाषेत लिहलेली आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी या पुस्तकाचे मोठ्या प्रमाणात उपयोग ठरत असल्याने धानय्या कौटगीमठ यांच्या पुस्तकाला महाराष्ट्रासह अन्य राज्यातून मागणी होत आहे.

About Author