देखभाल ठिबक, तुषार सिंचन संचाची…

सध्याच्या काळात पाण्याच्या काटेकोर वापरासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचा वापर वाढला आहे. हे संच योग्य पद्धतीने दीर्घकाळ चालण्यासाठी त्यांचे व्यवस्थापन आणि दुरूस्ती योग्य वेळेत करणे आवश्यक आहे.
ठिबक सिंचन यंत्रणा ः
ठिबक संचातून पाण्याच्या बरोबरीने विद्राव्य खते योग्य त्या प्रमाणात पाहिजे त्या वेळी परिणामकारकरीत्या देता येतात. खतांच्या मात्रेत बचत होते. यासाठी ठिबक सिंचन यंत्रणा योग्य पद्धतीने सुरू असणे गरजेचे आहे.
दररोजची देखभाल ः

पिकास पाणी देण्यास सुरवात करण्यापूर्वी पंप सुरू करून फिल्टर पाच मिनिटे बॅकवॉश करावा.
स्क्रिन फिल्टरच्या झाकणीवरील ड्रेन व्हॉल्व्ह उघडून जाळीमध्ये अडकलेली घाण काढून टाकावी.
ड्रिपर्स व्यवस्थित चालतात किंवा नाही याची पाहणी करावी.
पाण्याचा दाब, जमिनीवर पसरणारा ओलावा, संचातून होणारी पाण्याची गळती इत्यादी बाबींचे निरीक्षण करून योग्य दुरुस्ती करावी.
दर आठ दिवसांनी :
सँड फिल्टरचे झाकण उघडून आतून हात घालून वाळू साफ करावी. बॅकवॉश करावे. सँड फिल्टरमध्ये कधीही नाल्यामधील किंवा नदीची वाळू टाकू नये. सँड फिल्टरमध्ये नेहमी 3/4 भाग इतकी वाळू असायला पाहिजे. वाळूची पातळी कमी झाल्यास नवीन वाळू टाकून घ्यावी.
स्क्रीन फिल्टरचे झाकण उघडून आतील जाळीचा फिल्टर साफ करावी.
नियमितपणे आणि गरजेनुसार मेन, सबमेन स्वच्छ कराव्यात.
लॅटरलचा बंद प्लग काढून लॅटरलमध्ये नेहमीपेक्षा जास्त दाबाने पाणी सोडावे. त्या स्वच्छ करून घ्याव्यात.
रासायनिक प्रक्रिया :
ठिबक सिंचन प्रणाली चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी दर 10 किंवा 15 दिवसांनी आम्लप्रक्रिया, क्लोरिन प्रक्रिया गरजेनुसार करावी. आम्लप्रक्रियेमुळे ठिबक लॅटरलमधील कार्बोनेट व लोह यांचा साठा धुऊन काढला जातो. क्लोरीन प्रक्रियेमुळे पाण्यातील सूक्ष्मजंतूंची वाढ रोखली जाते. नियंत्रण मिळविले जाते.
ठिबक संचासाठी खते निवडताना ः
खते पाण्यात लवकर विरघळणारी असावीत.
खतांची विरघळण्याची क्षमता अधिक असावी.
पाण्यात विरघळताना किंवा विरघळल्यानंतर त्यातील क्षारांचे अविद्राव्य स्वरूपात एकत्रीकरण होता कामा नये.
खतांचा ठिबक सिंचन संचाच्या घटकावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही अशी खते निवडावी.
खतांची पाण्यात असणार्या क्षारांबरोबर कोणत्याही प्रकारची रासायनिक अभिक्रिया होणार नाही याची काळजी घ्यावी.
एकाच वेळी एकापेक्षा जास्त खते एकत्र द्यावयाची असल्यास त्याची आपापसात कोणतीही रासायनिक अभिक्रिया होणार नाही अशी खते द्यावीत.
तुषार सिंचन संचाची देखभाल :