दुधनी नगरपालिकेच्यावतीने स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांना श्रध्दांजली

। दुधनी : प्रतिनिधी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांना अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील नगरपरिषदेच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली. प्रारंभी म्हेत्रे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. म्हेत्रे हे 31 वर्षे दुधनीचे नगराध्यक्ष होते. त्यांनी गरिबांच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले. सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी आपल्या पदाचा वापर केला. याशिवाय राजकारणाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे होता. शेवटच्या श्वासापर्यंत ते शहराच्या विकासासाठी झटले. त्यांच्या जाण्याने सर्वांचे मोठे नुकसान झाल्याची भावना उपनगराध्यक्ष विजयकुमार मानकर यांनी व्यक्त केली. यावेळी नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे, नगरसेवक शिवानंद माड्याळ, अतुल मेळकुंदे, मुख्याधिकारी आतिश वाळुंज, गुरुशांत हबशी, महांतेश पाटील, चंद्रकांत अल्लापूर, श्रीनिवास पाटील, नगरसेविका ललिता गद्दी, सुनंदा चिंचोळी, अन्नपूर्णा पाटील, शबाना मोमिन, श्रीदेवी बसवनकेरी, चिदानंद कोळी, मल्लिनाथ म्हेत्रे, चनमल्लप्पा पाटील, रामचंद्र अत्ते, शांतलिंग चिंचोळी, सुधीर सर्वगोड, करनिरीक्षक राजेंद्र गुंड, विशाल चव्हाण, अभिराज डिंगणे, प्रशांत शिंदे, अमित बुर्हाणपुरे, बसवराज कुर्ले आदी उपस्थित होते.