दुधनीत डॉ.रामराव महाराज यांना श्रद्धांजली

। अक्कलकोट : प्रतिनिधी
बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज यांना अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील शिवाजीनगर तांडा येथे श्रध्दांजली वाहण्यात आली. डॉ. रामराव महाराज यांच्या जाण्याने बंजारा समाज पोरका झाल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. तसेच त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. प्रारंभी गोविंद राठोड, विश्वनाथ राठोड, पोमू राठोड, भानुदास राठोड, भिल्लू चव्हाण, सुभाष चव्हाण, गुरुनाथ राठोड, आकाश राठोड यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याशिवाय गांधीनगर तांडा, म्हेत्रे तांडा क्रमांक 1 व 2 येथेही श्रध्दांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला.