तुळजापूर येथे ठोक मोर्चा पर्व तिसरे संपन्न

। अक्कलकोट : प्रतिनिधी
मराठा क्रांती ठोक मोर्चा तुळजापूर येथे अक्कलकोट सकल मराठा समाजाचे बांधव तुळजापूर येथे एल्गार मराठ्यांचा जागर आई भवानीचा आशीर्वाद घेऊन तुळजापूर येथे ठोक मोर्चा पर्व तिसरे संपन्न झाले.
यावेळी मराठा समाजाचे महाराष्ट्र नेते व खासदार छत्रपती संभाजी महाराज व उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, युवा सेना तालुकाप्रमुख प्रतीक रोजकरी, अक्कलकोट सकल मराठा समाजाचे व शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार, मराठा सेवा संघाचे प्रवीण घाडगे, युवा सेनेचे प्रथमेश पवार, शुभम कानूरकर, आकाश गावडे, राहुल मोरे, शुभम चव्हाण, कुमार पाटील, आकाश पुजारी, रणवीर झिंगाडे व सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.