तालुक्यातील पूरग्रस्तांना वटवृक्ष मंदिर समितीच्यावतीने भोजन प्रसाद व राहण्याची सोय

Devsthan, Akkalkot

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे तालुक्यातील काही भागातील नागरिकांची उपासमारी होत असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी गांभीर्य लक्षात घेवून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने जेवणाची व राहण्याची सोय केल्याने सर्व स्तरांतून समाधान होत आहे.
परतीच्या पावसात अतिवृष्टी होवून तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर काही ठिकाणी नागरिकांचा संपर्क तुटला होता. अशा अडचणीत असलेल्या सर्व नागरिकांना नाष्टा, जेवण व राहण्याची सोय मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने देवस्थानच्या भक्तनिवास व विद्यार्थी वस्तीगृह येथे करण्यात आली.
या भोजन प्रसादाचे वितरण मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पराणे व सहकार्‍यांनी पूरग्रस्तांना केली. याप्रसंगी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यापासून देवस्थानच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत.

About Author