तालुक्यातील पत्रकारांना घरकुल योजना राबविण्याकामी प्रस्ताव तयार करणार : नंदकुमार जगदाळे

। अक्कलकोट : प्रतिनिधी
सोलापूर पत्रकार संघाच्या धर्तीवर अक्कलकोट तालुक्यातील पत्रकारांकरिता महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण विकास महामंडळ अंतर्गत (म्हाडा) घरकुल योजना राबविण्याकामी प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती अक्कलकोट तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार जगदाळे व महाराष्ट्र पत्रकार परिषद मुंबई शाखा-अक्कलकोटचे अध्यक्ष अरविंद पाटील यांनी संयुक्तरित्या सांगितले.
नवीन वर्ष व पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील तमाम पत्रकारांना भेट असल्याचे सांगण्यात आले. नंदकुमार जगदाळे व अरविंद पाटील यांनी अक्कलकोट तालुक्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आता माघार नाही, अनेक पत्रकारांचे उदरनिर्वाह हा पत्रकारितेवरच आहे; मात्र विविध गेली अनेक वर्षे दैनिकमध्ये कार्यरत आहेत, सातत्य ठेवलेले आहेत. मात्र त्यांना न्याय हक्कांपासून वंचित असून अक्कलकोट तालुका पत्रकार संघ व महाराष्ट्र पत्रकार परिषद मुंबई शाखा अक्कलकोट यांच्या संयुक्तरित्या सोलापूरच्या धर्तीवर म्हाडा अंतर्गत शासकीय जागेत सदरची घरकुल योजना राबविण्याकामी माहिती घेऊन प्रस्ताव तयार करुन संबंधितांची भेट घेण्यात येणार असल्याचे जगदाळे आणि पाटील यांनी सांगितले.
याकामांकरिता पत्रकार परिषदेच्या पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाने सदरचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
सोलापूर पत्रकारांचा राज्यातच पत्रकारांसाठी राबविण्यात येणारी पहिली योजना असून, दुसरा प्रकल्प अक्कलकोटला व्हावे याकरिता आमचा प्रयत्न राहणार आहे.
अक्कलकोट शहरात म्हाडाचा प्रकल्प आहेत, त्या प्रकल्पाच्या ठिकाणी महामंडळाची जागा आहेच, पुढची योजना राबवित असताना पत्रकारांकरिता खास योजना राबविण्याकामी राज्य सरकारकडे मागणी असणार आहे.
पत्रकारांसाठी गरज :
अक्कलकोट तालुक्यातील पत्रकारांकरिता गृहनिर्माण योजना असावी, या उदात्त हेतुने नवीन वर्ष व पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर असून कोवीड-19 मुळे सर्वत्र परिस्थिती पाहता पूर्वपदावर येण्यासाठी अजूनही काही दिवस जातील, काळाची गरज ओळखून पत्रकारांसाठी गृहनिर्माण योजना राबविण्याचा नवीन वर्षाचा प्रस्ताव आहे.
नंदकुमार जगदाळे,
अध्यक्ष, अक्कलकोट तालुका पत्रकार संघ