तालुक्यातील नागरिकांची गैरसोय दूर करीत असल्याने आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे सर्व स्तरातून कौतुक

। अक्कलकोट : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे बोरी, हरणा नदीत प्रचंड प्रमाणात पाणी येऊन नदी काठच्या गावच्या नागरिकांचे कोलाहाल झाले होते. आता भीमा नदीत प्रचंड प्रमाणात पाणी वाढ झाल्याने तडवळ भागातील नदी काठच्या गावातील नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी, तहसिलदार अंजली मरोड यांनी नागरिकांची गैरसोय दूर करीत असल्याने तालुक्यात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
परतीच्या पावसाच अतिवृष्टी होऊन बोरी व हरणा नदी नंतर भीमा नदीत प्रचंड प्रमाणात पाणी वाढू लागल्याने तडवळ भागातील नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून आमदार सचिन कल्यारशेट्टी, तहसिलदार अंजली मरोड, महसूल प्रशासन, कर्मचारी, अधिकारी, भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी तडवळ भागास तात्काळ भेट देऊन नदीकाठचे अंकलगी, आळगी, शेगाव, खानापूर आदी गावांना भेटी देऊन सतर्कतेचे इशारा देत ग्रामस्थांना या महापुरामुळे येत असलेल्या अनेक अडचणी शक्य असलेल्या अडचणी तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न आमदार सचिन कल्याणशेट्टी, तहसिलदार अंजली मरोड यांनी करीत सतर्कतेचे पूर्व सूचना देऊनही खानापूर येथील नागरिकांनी नवीन वस्तीवर न जाता नदीकाठच्या जुन्या वस्तीवरच राहिले होते. नदीला अचानक वाढलेल्या पाण्यामुळे जुन्या खानापूर गावाला पूर्ण वेढा टाकले होते. या गावात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी, अंजली मरोड यांनी ट्रक्टरच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सुखरूप नवीन वस्तीपर्यंत पोचविले.
गेल्या तीन दिवसापासून अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नदीकाठच्या गावांना जोरदार फटका बसला. अनेक गावांचा संपर्क तुटला. यामुळे पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले. अशा प्रसंगी जीवाची पर्वा न करता आमदार सचिन कल्याणशेट्टी तत्परतेने विविध ठिकाणी भेटी देऊन आपतग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत पोहचवण्यासाठी तहसिलदार अंजली मरोड यांना सूचना केली. त्यानुसार कर्तव्यदक्ष तहसिलदार अंजली मरोड यांनी पाण्यातून वाट काढत नागरिकांना वाचविण्याचे व त्यांना सुरक्षीत स्थळी पोहचविण्याचे त्यांचे जेवण खाण्याची, राहण्याची सोय करून दिले.
याप्रसंगी ज्या- त्या भागातील मंडल अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, महसूल प्रशासन, गटविकास अधिकारी महादेव कोळी, जिल्हा परिषद सदस्य शिवानंद पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजण, परमेश्वर यादवाड, धनंजय गाढवेसह भाजपा कार्यकर्ते व ज्या-त्या गावचे ग्रामस्थ नागरिकांचे व मुक्या जनांवरांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केले.