जुन्या राजवाड्याच्या बुरुजाची पडझड

। अक्कलकोट : प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट येथील संस्थानकालीन असलेल्या जुन्या राजवाड्याच्या अनेक बुरुजांचा अधाँभाग पडझड झाली आहे .तर अनेक बुरुज बुधवारी जमीनदोस्त झाले आहेत यात महत्वाचा असलेला ऐतिहासिक दुर्बीण बुरुज आज सकाळी जमीनदोस्त झाला आहे.
अक्कलकोट संस्थान चा जुना राजवाडा येथे आहे , यांचा ताबा संसथान कडे आहे.
काल आणि परवा आणि आज झालेल्या मुसळधार प्रवासामुळे या ऐतिहासिक राजवाड्याच्या उत्तर बाजूला असलेली दुर्बीण बुरुज अधेँबुधवारी सकाळी कोसळले आहे. राजवाडा वापरामध्ये नसल्याने कोणत्याही प्रकारची हानी झाली नसली तरी अक्कलकोट च्या सौन्दर्यात भर टाकणार्या राजवाड्याच्या काही भागाची हानी होत असल्यामुळे मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आज दिवसभर पाऊस असून ही ऐतिहासिक राजवाडयाची भिंत आणि दुर्बीण बुरुज कोसळले असलयाचे कळताच अक्कलकोट मधील नागरिक पावसात ही हा पडलेला बुरुज पाहण्यासाठी गर्दी केलेली होते.
ऐतिहासिक राजवाड्यावर किल्ल्याचे आणि संस्थांचे रक्षण व्हावे यासाठीकिल्ल्याच्या म्हणजे च राजवाडयाच्या सहा बाजूने हे ऐतिहासिक दुर्बीण बुरुज बांधण्यात आले होते.