जि.प.सोलापूर पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम; तोळणुर येथे लसीकरण मोहीम

Tolnur

। अक्कलकोट : प्रतिनिधी
तालुक्यातील तोळणूर येथे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या आदेशान्वये तोळणूर येथील पशुवैद्यकीय श्रेणी-2 दवाखान्यात पशु लसीकरण मोहीम राबविण्यात आले.
तोळणूर गाव महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरील शेवटच्या गाव आहे. या गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशु लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आले. याकामी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.धर्मराज कदम, डॉ.राठोड, डॉ.नाना सातपुते, जे.बी. सरकुंडे, एस.एस. कराळे,आर.एच.रंगदाळ, एम. एस. वडगावे यांनी परिश्रम घेतले.
तोळणूर आणि परिसरातील पशुपालक, शेतकरी आणि ग्रामस्थ यांचे पशुधनास लाळ खुरकत रोगप्रतिबंधक लसीकरण व इतर आजारी जनावरांना औषधोपचार करण्यात आले. गर्भ तपासणी, वांझ तपासणी, जंतनाशक, क्षार जीवनसत्त्व तपासून टॉनिक, गोचीड निर्मूलन औषधांचा पशुपालकांना वाटप करण्यात आले. गाय वर्ग 320, म्हैसवर्ग 71 असे एकूण 391 पशुधनाला लसीकरण करण्यात आले.
यावेळी गावातील ग्रामस्थ लक्ष्मीपुत्र कुसगल, सुधाकर कुसगल, मल्लिनाथ पाटील, गुरप्पा कुंभार, चनविरय्या हिरेमठ, बसवराज देगांव, निंगप्पा पुजारी, चेतन कुसगल, बाबुराव गुड्डेवाडी, सोमनाथ गंगा,कल्लप्पा तडलगी, सिद्धप्पा रब्बा आदी उपस्थित होते.
तोळणूर पशुवैद्यकीय श्रेणी-2 दवाखान्या अंतर्गत तोळणूर, कल्लप्पावाडी, उडगी, बोरोटी बु, बोरोटी खु, बबलाद, परमानंदनगर, अंदेवाडी, सातनदुधनी, तळेवाड, लक्ष्मीनगर असे एकूण 11 गावे येतात. या सर्व गावातील शेतकरी, ग्रामस्थ, पशुपालक यांनी त्यांच्या पशुधनाला विविध आजारावर उपचार करायचं म्हणलं तर डॉक्टर आणि परिचर नसल्याने शेतकर्‍यांना आणि पशुपालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. नुकतेच बोरी नदीच्या पाणी शिरल्याने नदीकाठच्या गावातील हजारो पशु असून अनेक पशु विविध आजाराने त्रस्त आहे. तरी संबंधित विभागाच्या अधिकार्‍याने याकडे त्वरित लक्ष घालून तोळणूर पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टर व परिचर पद भरण्यात यावे, असे मागणी आत्मा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी यांनी केली आहे.

About Author