जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या एफआरपीप्रमाणे लक्ष्मी शुगर दर देणार : चेअरमन सिध्दाराम म्हेत्रे
। अक्कलकोट, प्रतिनिधी
मातोश्री लक्ष्मी शुगर को जनरेशन इंडस्ट्रीज हा कारखाना शेतकर्यांच्या उन्नतीसाठी काढलेला आहे. यातून कुठल्याही प्रकारचा नफा कमविण्याचा उद्देश मुळीच नाही, शेतकरी जगला तरच कारखाना जगणार आहे. यंदा शेतकरी सध्या अतिवृष्ठी आर्थिक संकटात आहे. मातोश्री कारखान्याला शेतकर्यांनी ऊस देऊन सहकार्य करावे जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या एफआरपी प्रमाणे मातोश्री कारखाना ऊसाला भाव देण्याची ग्वाही माजी गृह राज्यमंत्री तथा चेअरमन सिध्दाराम म्हेत्रे यांनी दिली.
रुदेवाडी कै. सातलिंग नगर येथील मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याच्या 8 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी माजी आ. सिध्दराम म्हेत्रे बोलत होते.
मातोश्री कारखान्याचे कार्यकारी संचालक शिवराज म्हेत्रे, उपाध्यक्ष गोकुळ शिंदे, गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे, पंचायत समिती सदस्य विलास गव्हाणे, न.पा.विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी, काँग्रेसचे शहर अध्यक्ष भिमाशंकर कापसे, माजी नगर सेवक रामचंद्र समाणे, राजकुमार लकाबशेट्टी, शिवराज स्वामी, शरणपा गायगवळी आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी कारखान्याचे कार्य संचालक शिवराज म्हेत्रे यांनी यंदा 6 लाख मे.टन ऊस गाळपाचे उदिष्ठ असल्याचे स्पष्ठ केले. शेतकर्यांच्या हितासाठी हा काररवाना चालु असल्याचे स्पष्ठ केले. अनेक संकटे आली तरी हा काररवाना आणि चेअरमन सिद्धाराम म्हेत्रे हे लोकांच्या व शेतकर्यांच्या हितासाठी जनतेच्या सहकार्यानेच सर्व संकटावर यशस्वी मात केली आहे. अडचणी आहेत म्हणून जीवनाला महत्व आहे, अडचणी नसतील तर ते जीवन कसले सर्व संकटे सर्वाच्या सहकार्याने आपण मात केली आहे. या कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांची उन्नतीच साधली असल्याचे स्पष्ठ केले.
याप्रसंगी चेअरमन सिद्धाराम म्हेत्रे यांनी कारखान्यातील कामगारांना एक महिन्याच्या पगाराचा दिवाळी सणाकरिता बोनस जाहिर केला.
याप्रसंगी कारवान्याचे वर्क्स मॅनेजर आर.के. गदादे, प्रॉडक्शन मॅनेजर पी.बी. पवार, केन मॅनेजर के.एल. व्हसुरे, विश्वनाथ हडलगी, गुलाब खैराट, शिरसे गुंड, सोमवंशी लोहार, निंबाळ, एस. एस. गुरव, काररवान्याचे सर्व कर्मचारी वृंद, तालुक्यातील शेतकरी ऊस उत्पादक सदस्य, पंचक्रोशीतील शेतकरी नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



