जयहिंद शुगर्सच्या कार्यामुळे शेतकरी सुखी होणार : खासदार महास्वामीजी

jayhind

। अक्कलकोट : प्रतिनिधी
नानाविध कारणांमुळे साखर कारखानदारीचा उद्योग अडचणीत आला आहे.कारखानदारी अडचणीत म्हणजे साहजिकच ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येणारच. मात्र स्थापनेपासून जयहिंद शुगर्सने योग्य कार्यपध्दत अवलंबली आहे. ओद्योगिक विकासासोबतच सामाजिक बांधीलकी जपत जयहिंदची वाटचाल सुरू आहे. आणि जयहिंदच्या याच आर्थिक शिस्तीच्या कार्यपध्दतीमुळे शेतकर्‍यांच्या आयुष्यात क्रांती निर्माण झाले आहे असे गौरवोद्गार खासदार डॉ.जयसिद्वेश्वर महास्वामीजी यांनी व्यक्त केले.
दक्षिण सोलापूर तालूक्यातील आचेगाव येथे जयहिंद शुगर्सच्या सहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ खासदार डॉ जयसिध्देश्वर महास्वामीजी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. यावेळी बोधले महाराज, डी.सी.सी.बॅकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे,कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलींद काळे,चेअरमन गणेश माने देशमुख, मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख,कार्यकारी संचालक मोहन पिसे, शेतकी अधिकारी राजेंद्र जेऊरे,प्रा.माऊली जाधव,विजय पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरूवातीला संतोष पाटील व शैलजा पाटील या दांपत्याच्या हस्ते महापूजा करण्यात आले.यानंतर गोमातेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत ऊस टाकून सहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
पूढे बोलताना खासदार डॉ जयसिध्देश्वर महास्वामीजी म्हणाले की,यावर्षी मुबलक पावसाळा झाल्याने ऊसाचे क्षेत्र वाढणार आहे.जयहिंदने नेहमीच शेतकर्‍यांच्या हितासाठी कार्य केल्याने शेतकर्‍यांनी ऊस देण्याचे आवाहन महास्वामीजींनी केले.यावेळी माऊली जाधव, मिलींद काळे व शैलेश कोतमिरे आदींनी मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे स्वागत करत चेअरमन गणेश माने देशमुख यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी अभिनंदन गांधी,लाला राठोड, व्यंकट मोरे,अरविंद शिंदे, दयानंद पवार, विशालराज नन्ना, धनू जाधव यांच्यासह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजु चव्हाण यांनी तर आभार मोहन पिसे यांनी मानले.

बुधवारी जयहिंद शुगर्सच्या सहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डीसीसी बॅकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे आणि कॉसमॉस बॅकेचे चेअरमन मिलींद काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ही बाब लक्षात घेऊन डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी यांनी आपल्या मनोगतातुन उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले की, जयहिंदच्या पारदर्शी कारभाराला बॅकेकडून नेहमीच सहकार्य लाभले आहे.म्हणून कोणत्याही काळजीविना शेतकर्‍यांनी जयहिंदला ऊस पूरवठा करण्याचे आवाहन त्यांनी केले. – खासदार डॉ जयसिध्देश्वर महास्वामीजी

जयहिंद शुगर्सच्या गळीत हंगामाचा शुभारंभ केल्यानंतर सभा पार पडली यात मनोगत व्यक्त करताना खासदारांनी मला खासदार म्हणण्यापेक्षा महाराज म्हणलेले अप्रुप वाटत असल्याचे सांगितले.आजवर धर्माचारणाच्या भूमिकेतून वावरलो आहे.भक्तांनी भरभरून प्रेम दिल्याने खासदारापेक्षा महाराज शब्दात अधिक आनंद मिळतो.

About Author