चपळगाव येथे महिलांच्या पदयात्रेस प्रचंड प्रतिसाद

। चपळगाव : प्रतिनिधी
चपळगाव येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जून महाराज ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महिलांनी काढलेल्या पदयात्रेस उदंड प्रतिसाद मिळाला.या पदयात्रेत अनिता काकू पाटील,रोहिणी उमेश पाटील,वर्षा संतोष पाटील,अपर्णा सुर्यकांत बाणेगाव, वर्षा सिध्दाराम भंडारकवठे यांच्यासह पाटील परिवार व गावातील महिला ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.प्रारंभी का पदयात्रेच्या सुरूवातीला ग्रामदैवत श्री मल्लिकार्जून महाराजांच्या चरणी सर्वांनी दर्शन घेतले. या पदयात्रेत ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांची चिन्हे सांगण्यात आली.ठिकठिकाणी या पदयात्रेचे स्वागत करण्यात आले.