चपळगांव येथील शंभूलिंग अकतनाळ मित्र परिवार तर्फे अक्कलकोट घडामोडी टिमचा सत्कार

akkalkot ghadamodi

। अक्कलकोट : प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील सोशल मिडीया वरील सर्वात मोठा व सक्रीय ग्रुप असलेला अक्कलकोट घडामोडी ग्रुपचे मुख्य संस्थापक अध्यक्ष आंनद चौगुले,सचिव धोंडपा नंदे व मिडीया नियंत्रक दिपक चौगुले यांनी नुकतेच कुरनूर धरणा भेट दिले. कुरनूर धरणावरुन लाईव्ह करुन ताजे अपडेट अक्कलकोट घडामोडी वरील सदस्यांनी माहिती दिले.

चपळगांव येथील सामाजिक कार्यकर्ते पञकार शंभूलिंग अकतनाळ याची भेट झाली त्यांनी आग्रहाने आपल्या घरी घेऊन जाऊन अक्कलकोट घडामोडी ठिमचा सत्कार केला.आंनद चौगुले,धोंडपा नंदे व दिपक चौगुले याचा मानाचा कोल्हापूरी फेटा बांधून पुस्तक भेट देऊन सन्मान केला.शंभूलिंग अकतनाळ हे चपळगांव येथे तरूणांना मार्गदर्शन करतात व विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात अक्कलकोट घडामोडीचे कौतुक करून ठिमचे सन्मान केला.
यावेळी गावातील तरूण मंडळी आकाश दुलंगे, अंबरीश माशाळे, भैय्या बुगडे, अंबरीश बिराजदार व स्वप्नील बणजगोळे आदिजण उपस्थित होते. अक्कलकोट घडामोडी हा ग्रुप सोशल मिडीयाचा योग्य वापर करुन तालुक्यातील जनतेचा जन जागृती व विविध प्रश्नाला वाचा फोडण्याचा महत्त्वाचे व्यासपीठ आहे असे बोलताना युवकांनी भावना व्यक्त केले.
अक्कलकोट घडामोडीचे ग्रुपचे मुख्य संस्थापक अध्यक्ष आंनद चौगुले यांनी शंभूलिंग अकतनाळ याचे मनपूर्वक आभार व्यक्त केले.

About Author