ग्रामपंचायत ग निधी बंक्कळ आद, इलेक्शन आगली, बिनविरोध भ्याडरी

gram

। अक्कलकोट : प्रतिनिधी
ग्रामपंचायत सरपंच आरक्षण निवडणुकीनंतर जाहिर होणार असल्यामुळे पॅनल प्रमुख गोंधळात पडले आहेत. मात्र ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी प्रत्येक गावात जोरदार हालचाली सुरू आहे. तरूण वर्ग मात्र पॅनलच्या माध्यमातुन निवडणुक न लढविता वैयक्तिक नशीब आजमाविण्यासाठी सज्ज झाले आहे. ‘ग्रामपंचायत ग निधी बक्कळ आद इलेक्शन आगली’ असा पवित्रा तरूण वर्गाची आहे.
भुरीकवठे, किरनळ्ळी, गोगांव आदी गावात ग्रामपंचायत रणधुमाळी सुर झाली आहे. दि. 23 डिसेंबर पासुन उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. मात्र अद्याप पर्यंत पॅनल प्रमुखच तळ्यात- मळ्यात आहेत. पूर्ण पॅनल तयार नाही, मोर्चा बांधणीला वेग आला तरी सरपंच आरक्षण निवडणुकीनंतर जाहिर होणार आहे. त्यामुळे पैसा खर्च करून पद न मिळाल्यामुळे पंचाईत होणार आहे. म्हणुन सर्वच पॅनल प्रमुख द्विदा मनस्थितीत आहेत. पॅनल तयार केले तर काय होणार, नाही तयार केले तर काय होणार या बाबत तर्क वितर्क करीत आहेत. गावातील काही लोक बिनविरोध करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केले आहे. वागदरी ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न चालु आहे. मात्र परिस्थिती अशी आहे की, बैठकित बिनविरोध करा म्हणणारे पॅनल तयार असल्याचे सांगतात.
पॅनल प्रमुखाला बोलावुन चर्चा जरी सुरू झाले असले तरी खरी कसोटी बिनविरोध सदस्य निवडताना होणार आहे. अनेक हेवेदावे, वैयक्तिक भांडणे, यांना घेवु नका, त्यांना घेवु नका, तरूणांना घ्या, जाती जातीतील भांडणे, अशा एक ना अनेक समस्यांना सामना करावा लागणार आहे. काहींना तर बिनविरोध नको आहे. त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे. तरूण वर्ग पॅनलच्या माध्यमातुन निवडणुक न लढविता वैयक्तिक नशीब अजमाविण्यासाठी गुडग्याला बांशिंग बाधुन तयार झाले आहे. जर वागदरी ग्रामपंचायत बिनविरोध न झाल्यास तीन पॅनल सध्या तयार आहेत. बिनविरोध करण्यासाठी अनेक नियम व अटी शोशल मिडियांच्या माध्यमातुन समोर येत आहे. वागदरी ग्रामपंचायत निवडणुक सतत अटी तटीची होत आहे. वागदरी ग्रामपंचायत 15 सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत आहे. खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निर्णायक मतदार संघ म्हणुन पाहिला जाते. सतत ग्रामपंचायत निवडणुकीत माजी जि.प.विजयकुमार ढोपरे, रतन बंगरगी, श्रीशैल ठोंबरे, पंचायत समिती सदस्य गुंडप्पा पोमाजी, सुनिल सावंत, शिवराज पोमाजी, रविकुमार वरनाळे, सुधीर सोनकावडे यांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष आहे. सध्या तरी हे नेते बिनविरोधसाठी अनुकुल असले तरी कार्यकर्ते कमालीचे नाराज आहे. एकुण परिस्थिती पहाता बिनविरोध सदस्य निवड करताना परिस्थिती हाताबाहेर जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तरूण वर्गाची आशा अपेक्षा जास्त आहे. ‘ग्रामपंचायत ग निधी बक्कळ आद इलेक्शन आगली’ एकुण परिस्थिती पहाता निवडणुक लागे ग्रामपंचायतची, लक्ष मात्र निधी पाशी’ असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही.

About Author