गळोरगी तलाव शंभर टक्के भरुन ओव्हरफ्लो; पर्यटन म्हणून विकसित करण्याची मागणी

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी तलाव 100 टक्के भरुन ओव्हरफ्लो झाल्याने गळोरगीसह पंचक्रोशीतील शेतकर्यांतून समाधान होत आहे; मात्र या तलावाच्या बांधावरील काटेरी झुडपे तोडणे, परिसराचे सुशोभिकरण करुन पर्यटन म्हणून विकसित करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
सन 2019 सालात आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली व खा.डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी यांच्या उपस्थितीत अनुलोमच्या माध्यमातून अनुलोमच्या ‘गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार’ या उपक्रमांतर्गत गळोरगी तलावातील 3 लाख घनमिटर गाळ काढण्यात आले. सदरील गाळ काढण्याचे काम अनुलोमचे भागजनसेवक राजकुमार झिंगाडे हे पाहत होते. सदरील गाळ गळोरगीसह पंचक्रोशीतील शेतकर्यांनी आपल्या शेतात टाकल्याने शेतीसह सदरील भागात सुजलाम् सुफलाफ झाल्याने शेतकर्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
गळोरगी तलाव हा सन 1972 च्या दुष्काळात बांधून पुर्ण झाले असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. सदरील तलाव 105 हेक्टरमध्ये व्यापलेला आहे. या तलाव परिसरात चातक, बदल, राजहंस, फुलपाखरु यासह विविध पक्षा या ठिकाणी येत असल्याचे नागरिक चंद्रकांत आंदोडगी यांनी सांगितले.
यावेळी शिवानंद स्वामी, वहिदपाशा शेख, सेवानिवृत्त एएसआय सत्तारभाई शेख, शरणप्पा जग्गे, संतोष संकपाळ, श्रीकांत प्रचंडे, शिवशरण प्रचंडे, भीमशा बडदाळे, कलप्पा आंदोडगी, सुधाकर प्रचंडे, शेखर गोब्बुरे, महादेव कोळी, राजशेखर बिराजदार, संजय कवटगी, शिवानंद बिराजदार, भीमाशंकर आजुरे, अशोक संगापुरे, बाळु पोळ आदी उपस्थित होते.
तलावाचा परिसरात विविध रंगबेरंगी लायटिंग, बसण्यासाठी सिटींग बेंच, बाग-बगीचा, बोटींग यासह विविध सोयी-सुविधा केल्यास अक्कलकोट येथे स्वामी दर्शनासाठी आलेले भक्त निश्चितच गळोरगी गावास ‘तिर्थक्षेत्रातून पर्यटन’क्षेत्रास भेट दिल्यास गावातील युवकांना रोजगार उपलब्ध होईल. बेराजगार कमी होवून छोटे-मोठे व्यसाय करण्यास युवक पुढे येतील.
वहिदपाशा शेख, ग्रामस्थ, गळोरगी