जयराम राठोड यांची पोलीस उपनिरिक्षक म्हणून पदोन्नती

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील शिवगुंड तांडा येथील सुपुत्र जयराम देवेंद्र राठोड यांची नवी मुंबई पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरिक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे. तालुक्यातील एका तांड्यातील गरिब परिस्थितील बंजारा युवकाने मिळवलेल्या या यशाचे समाजातून कौतुक होत आहे. जयराम हे नवी मुंबई पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली. त्यात त्यांनी भरघोस यश संपादन करित पोलीस उपनिरिक्षकपदाच्या परिक्षेत विशेष प्राविण्य संपादन केले. त्यांच्या या यशात बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते तुकाराम राठोड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाचे अक्कलकोट स्टेशनच्या पंचक्रोशीसह समाजातून अभिनंदन केले जात आहे.