खेडगी महाविद्यालयात ई-वेबिनार संपन्न

Web

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीसंचलित सी. बी. खेडगीज महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हिंदी विभागाच्यावतीने ‘आधुनिक हिंदी साहित्य की दार्शनिक पृष्ठभूमि’ या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ई वेबिनार संपन्न झाले.
अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन शिवशरण खेडगी हेहोते. प्रास्ताविक भाषण हिंदी विभाग प्रमुखप्रा. विठ्ठलवाघमारे यांनी केले. या वेबिनार चेउद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठचे (नांदेड) प्र.कुलगुरू डॉ.जोगेन्द्रसिह बिसेनयांच्या हस्ते करण्यात आले.
उदघाटनाप्रसंगी डॉ. बिसेनयांनी प्राध्यापक हे नम्रशिल, विवेकशील व विनयशील असले पाहिजेत कारण जर डॉक्टर बिघडले तर एक पेशंट मरेल. इंजिनियर बिघडले तर इमारत पडेल. पण प्राध्यापक बिघडले तर समाज, राष्ट्र बिघडतील असे बोलताना सांगितले.
डॉ. जयप्रकाश कदम (दिल्ली) यांनी म्हणाले, आज समाजाला कार्ल मार्क्स, युग्म, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची नितांत गरज आहे. या थोर राष्ट्र पुरुषांचे विचार अंमलात आणले तर समाज सुधारण्यास वेळ लागणार नाही. यासाठी अध्यापनात अशा समाज सुधारकांचे विचार सांगून विद्यार्थ्यांचे मनपरिवर्तन करावे, असे म्हणाले.
प्रमुख पाहुणे डॉ. प्राण जगी (अमेरिका) काही कारणास्तव ते ऑनलाइन सहभाग नाही झाले. पण मेसेजच्या माध्यमातून अध्यक्ष, उद्घाटक, प्रमुख मार्गदर्शक, आयोजक, सहभागी प्राध्यापक, शोधार्थी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमांमध्ये अध्यक्षीय भाषण प्रभारीप्राचार्य प्रा.संध्या परांजपे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.जे.पाटील यांनी केले तर आभार दाजी कोळेकर यांनी मानले.
या कार्यक्रमास प्रा.अप्पासाहेब देशमुख, प्रा. अबाराव सुरवसे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक वर्ग, कार्यालयीन प्रमुख प्रकाश सनकळ, शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले.

About Author