कोळेकरवाडी पूरग्रस्तांना खेडगी परिवाराच्यावतीने जीवनावश्यक किटचे वाटप

kolekarwadi

। अक्कलकोट : प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे कोळेकरवाडीयेथील पूरग्रस्तांना खेडगी परिवार, आकाश कलशेट्टी मिञ परिवारच्यावतीने जीवनावश्यक वस्तू व अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले.
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मौजे कोळेकरवाडी परिसरातील बोरी नदीला पूर आला होता. नदीचे पाणी गावातीलवस्तीमध्ये घुसून अनेक घरांना याचा तडाखा बसला होता.अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. यामुळे रहिवाशांचे संसारोपयोगी वस्तू सह जीवनावश्यक वस्तूंचेमोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
त्यामुळे तेथील नागरिकांना त्याचा सामना करावा लागला. त्या स्थितीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. दरम्यान, या घरांमध्ये राहणार्‍या नागरिकांना व महिलांनाआकाश कलशेट्टीयांच्या हस्ते गहू, तांदूळ, डाळ, चहा पावडर, बिस्किट आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे अक्कलकोट शहर प्रमुख योगेश पवार, भारत राजेगांवकर,राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका अध्यक्ष पवन पाटील, राकेश गवंडी, गुरु कुंभार, आफताब अत्तार, नासिर शेख, बिलाल शैक्ख, शूभम माने, समर्थ कलशेट्टी, बाबी कलशेट्टी, प्रवीण हिरेमठ व मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.

About Author