कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपाच्यावतीने तहसिलदारांना निवेदन

। अक्कलकोट : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दोन विधेयकांच्या माध्यमातून कृषीक्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवून सुखकर केला आहे. 2022 पर्यंत शेतकर्यांना दुप्पटीने वाढ होण्याच्या दिशेने केंद्र सरकार कृषी विधेयक अंमलात आणले आहे. यामुळे शेतकर्यांचे दशा व दिशा बदलणार आहे. असे समर्थनार्थ निवेदन अक्कलकोट शहर व तालुका भाजपाच्यावतीने प्र.नायब तहसिलदार राठोड यांना निवेदन देण्यात आले.
शेतकर्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव देणे तसंच शेतकर्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचा जीवनस्तर उंचावण्याचे ध्येय मोदी सरकारने ठेवले आहे. या उद्देशाने पंतप्रधान मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारत सरकार, कृषी मंत्रालय आणि कृषी तज्ञ यांनी हे ध्येय पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. आत्मनिर्भर भारत अभियांनांतर्गत 1 लाख कोटी रुपयाचा कृषी पायाभूत सुविधा निधी असो वा देशभरात 10 हजार कृषी उत्पादक संस्था (एफपीओ) निर्माणाचा निर्णय असो मोदी सरकारने देशातील बळीराजाला त्याच्या शेतमालाला योग्य भाव कसा मिळेल या दिशेने प्रयत्न केले आहेत.
या विधेयकांसंदर्भात शेतकरी आणि देशाच्या नागरिकांमध्ये भ्रम आणि गैरसमज जाणूनबुजून निर्माण केले जात आहेत. नव्या विधेयकांमुळे सरकारकडून किमान आधारभूत किंमतीला केली जाणारी शेतमालाची खरेदी यापुढेही चालू राहणार आहे. या वर्षातील रब्बी पिकांची एमएसपी येत्या आठवड्यात घोषित केली जाईल. त्यामुळे शेतकर्यांनी किमान आधारभूत किंमतीने होणारी सरकारी खरेदी बंद होणार या प्रचाराकडे दुर्लक्ष करावे. एमएसपी आधारे होणारी खरेदी यापुढेही चालू राहील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत जाहीर केले आहे. केवळ आणि केवळ शेतकर्यांच्या हितरक्षणार्थच ही विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. विधेयकांमधील तरतुदींनुसार उत्पादित माल विकल्यानंतर तीन दिवसांच्या आत शेतकर्यांना रक्कम देण्याचे निर्धारित करण्यात आले आहे. शेतकर्यांच्या जमिनीवरील मालकी हक्कांचे देखील शतप्रतिशत संरक्षण केले जाणार आहे. उत्पादित शेतमालावर शून्य टक्के कर असल्याने साहजिकच शेतकर्यांना अधिकाधीक लाभ होणार आहे असे तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहेत.
यावेळी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी, ज्येष्ठ नेते मल्लिनाथ स्वामी, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र बंदिछोडे, गुंडप्पा पोमाजी, खय्युम पिरजादे, न.प.पक्षनेते महेश हिंडोळे, भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, परमेश्वर यादवाड, दयानंद बिडवे, जयशेखर पाटील, माजी सरपंच प्रदिप पाटील, अप्पासाहेब बिराजदार, रमेश कापसे, आनंद पवार, विनोद मोरे, बबलू कामनुरकर, कांतू धनशेट्टी विश्वनाथ इटेनवरू, सैपन मुजावर, बंटी राठोड, सुनिल गवंडी, स्वामीनाथ घोडके, विजय लांडगे, आतिष पवार, सिध्दाराम माळी, धनंजय गाडवे, नागेश कलशेट्टी, अप्पाशा पुजारी आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.