कल्लहिप्परगे गावातील पोलीस पाटलाने पुरात अडकलेले कामगार व जनावरे वाचवले

kalhipargi

। कलहिप्परगे : प्रतिनिधी
कल्लहिप्परगे ता.अक्कलकोट येथे गावातील पुरात अडकलेले जनावरे व कामगार यांना पोलीस पाटील संतोष गुजा यांनी गावक-यांच्या मदतीने वाचवले. गुरूवारी रात्री अकरा वाजता भीमी नदीकाठच्या गावात महापूर आला होता. मल्लिकार्जुन बनसोडे हे कामगार शेतात अडकले होते. हे कोणाला माहीत नव्हते. इतकेच नव्हे तर चार पाच जनावरे देखील अडकले होते. पाणी वेगाने वाढत होते. ही बातमी पोलीस पाटील संतोष गुजा ह्यांना समजली.गावात कुणाला माहीतच नव्हते. रात्रभर पाऊस होता.पुरात अडकलेले आहे हे बातमी ऐकून गावकरी यांच्या मदतीने मल्लिकार्जुन बनसोडे आणि जनावरे सुखरूप पणे बाहेर काढण्यात आले. शेतकरी व गावकरी यांनी पोलीस पाटील चे अभिनंदन केले. अशोक गुजा यांचे गाय- जनावरे पाण्यात अडकले होते. कामगार मल्लिकार्जुन बनसोडे रातभर पाण्यात होता. शिवसेना शाखाप्रमुख यलप्पा मोरे, पोलीस पाटील संतोष गुजा, सहकारी भोगप्पा पुजारी, सिद्धाराम पुजारी, बसवराज मोरे , नितीन मोरे यांनी प्रयत्न करून जनावरे व कामगाराला सुखरूपपणे बाहेर काढले.

About Author