कर्जाळ जि.प. कन्नड शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

। अक्कलकोट, प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद कन्नड शाळा कर्जाळ येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक बसवराज गुरव यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती सांगताना म्हणाले, सावित्रीबाई फुले या पहिल्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.
महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.
आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी मुख्याध्यापक बसवराज गुरव, उपशिक्षिका सुवर्णा पाटील, विद्यार्थी उपस्थित होते.